भारत हा जसा विविधतेने नटलेला आहे तसाच तो अनेक अलौकिक आणि आश्चर्यकारक गोष्टींनी देखील भरलेला आहे. भारतामध्ये अनेक पद्धतीने जर पाहिले आपण तर परंपरा, वेशभूषा, भाषाशैली ही राज्य राज्यांमध्येच नव्हे तर दर पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर बदलताना आपल्याला दिसून येते. इतकी विविधता भारतामध्ये ठासून भरलेली आहे.
अगदी त्याच पद्धतीने भारतामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या ऐकून आपल्याला आचार्य वाटते किंवा आश्चर्य वाटाव्या अशा त्या अलौकिक आहेत. अशा घटनांमागे किंवा बाबीं मागे तशी कारणे देखील आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपल्या भारतामध्ये जम्मू-काश्मीर या राज्यामध्ये असे एक घर आहे की स्वयंपाक घर हे पाकिस्तान मध्ये आहे आणि हॉल हा भारतामध्ये आहे.
तसेच काही रेल्वे स्टेशन असे आहेत की या ठिकाणी उतरून तुम्हाला चक्क दुसऱ्या देशामध्ये जाता येते. याच पद्धतीने जर आपण विचार केला तर भारतामध्ये असे एक रेल्वे स्टेशन आहे की त्या ठिकाणी राहत असलेली लोक दररोज रेल्वेची तिकीट तर खरेदी करतात परंतु प्रवास मात्र कुठेच करत नाहीत. वाटलं ना आश्चर्य. त्यामुळे आपण या लेखात याविषयीची सविस्तर कारणे जाणून घेऊ.
काय आहे दयालपुर रेल्वे स्टेशनचे वैशिष्ट्ये?
उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या दयालपुर रेल्वे स्टेशनचा हा किस्सा असून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीमध्ये या रेल्वे स्टेशनची सुरुवात झाली व त्यावेळी चे रेल्वेमंत्री हे लालबहादूर शास्त्री होते. आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी हे एक खूप मोक्याचे रेल्वे स्टेशन होते परंतु 2016 मध्ये ते बंद करण्यात आले. हे स्टेशन बंद करण्यामागे रेल्वे विभागाकडून काही वेगळी कारणे देण्यात आलेले होती. यामध्ये महत्त्वाचे असे की याबाबतीत असलेले जे काही मानके असतात ते जर पूर्ण करता आले नाही तर स्टेशन बंद केले जातात असे रेल्वेच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.
या स्टेशनच्या बाबतीत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती पाहिली तर त्यांच्या मते भारतीय रेल्वे कडून काही मानके याबाबतीत निश्चित करण्यात आलेली आहेत व अशा परिस्थितीमध्ये जर प्रवासी या सेवेचा लाभ घेत नसेल तर हे रेल्वे स्थानक बंद करण्यात येते. या ठिकाणी मुख्य मार्गावर एकही स्टेशन नाही आणि कमीत कमी 50 तिकीट दिवसातून कापली जाने खूप महत्त्वाचे आहे. 50 नाहीतर कमीत कमी 25 तिकिटांची विक्री तरी होणे गरजेचे आहे.
या सगळ्या कारणांमुळे शेवटी हे स्थानक बंद करावे लागले. परंतु आता हे रेल्वे स्टेशन बंद आहे त्याकरिता दयालपुर आणि परिसरातील गावातील लोकांनी दयालपुर रेल्वे स्टेशन परत सुरु करावे याकरिता अनेक प्रयत्न सुरू केले असून अर्जफाटे देखील करण्यात आलेले आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून हे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्यात आलेले आहे परंतु आता त्या ठिकाणच्या रहिवाशांनी ठरवले आहे की आता हे रेल्वे स्टेशन बंद पडू देणार नाहीत.
हे रेल्वे स्टेशन पुन्हा सुरू व्हावे म्हणून अटीनुसार दररोज कमीत कमी स्टेशनच्या परिसरामध्ये राहणारे लोक रोज निधी गोळा करून कमीत कमी तिकीट विक्रीचे टारगेट पूर्ण करत असून सध्या हे रेल्वे स्टेशन केवळ थांबण्याचे ठिकाण म्हणून सुरू करण्यात आले असून संपूर्ण दिवसात तेथे सध्या एक ते दोन गाड्या थांबत आहेत. दररोज कमीत कमी 25 तिकीट विक्री व्हावी या उद्देशाने या ठिकाणचे लोक निधी करून किमान तिकीट विक्री व्हावी व हे स्टेशन पुन्हा सुरू व्हावे यासाठी दररोज तिकीट काढतात परंतु प्रवास मात्र करत नाहीत.