Maharashtra Tourist Place : कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला फिरायचे असेल तर महाराष्ट्रातील हे ठिकाण एक नंबर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tourist Place:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक पर्यटनस्थळी भेट देण्याची इच्छा असते. परंतु बऱ्याचदा आपल्या खिशाचा बजेट पाहणे खूप गरजेचे असते. पैशांचा अंदाज पाहूनच प्रत्येक जण हा कुठलीही गोष्ट करत असतो व तसाच विचार हा पर्यटनासाठी देखील करणे गरजेचे असते. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जी काही नावाजलेली आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत ते कधी कधी आपण राहतो त्या ठिकाणापासून दूर असतात किंवा त्या ठिकाणी असलेले इतर खर्च हे खूप जास्त प्रमाणात असतात.

त्यामुळे पर्यटनाची इच्छा असताना देखील आपल्याला फिरता येत नाही. परंतु या बाबतीत काही काळजी करण्याची गरज नसून जर तुम्हाला कमीत कमी खर्चात चांगल्या ठिकाणी फिरण्याची इच्छा असेल तर तुम्ही महाराष्ट्रातीलच हिरवाईने नटलेली व प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पाहू शकतात. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेणार आहोत जे कमीत कमी खर्चामध्ये तुमची पर्यटनाची इच्छा पूर्ण करू शकतात.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे

1- सूर्यमल- सूर्यमल हे हिल स्टेशन असून नाशिक शहरापासून ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाचा जर आपण विचार केला तर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असून या ठिकाणी असलेले नयनरम्य दृश्य बघण्यासाठी खूप पर्यटक या ठिकाणी येत असतात. समुद्रसपाटीपासून 800 फूट उंचीवर असलेले सूर्यमल हे हिल स्टेशन खूप पाहण्यासारखे असून या ठिकाणहून तुम्हाला वाईल्ड लाईफ सेंचुरी आणि देवबंद मंदिरात देखील जाता येणे शक्य होते.

2- करौली- नाशिक शहरापासून साधारणपणे 150 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणचे प्रसन्न वातावरण आणि निसर्ग सौंदर्य खूप अल्हाददायक आहे. या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे असून हे पाहण्यासाठी अनेकजण खूप दूरवरून पर्यटनासाठी येतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरण्याची इच्छा असेल तर हे हिल स्टेशन तुमच्यासाठी पर्वणी ठरू शकते.

3- लोणावळा खंडाळा- लोणावळा खंडाळा हे सगळ्यांना माहिती असलेले व प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. नाशिक शहरापासून 235 किलोमीटर अंतरावर लोणावळा खंडाळा हिल स्टेशन असून या ठिकाणी तुम्ही लोहगड किल्ला तसेच लोणावळा तलाव, अनेक शूटिंग पॉईंट तसेच धबधबे व इंडियाज ड्युक नोज या ठिकाणांना भेटी देऊ शकतात. या ठिकाणी हिरवाईंनी नटलेल्या टेकड्या व निसर्गसौंदर्य तुमच्या मनाला भूरड घालते.

4- भंडारदरा- भंडारदरा हे ठिकाण नाशिक शहरापासून बहात्तर किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी असलेले सर्वांच्च शिखर म्हणून कळसुबाई खूप प्रसिद्ध आहे. तसेच भंडारदरा या ठिकाणी असलेला रंधा धबधबा, छत्री धबधबा आणि रतनवाडी गाव यासारखे ठिकाणी देखील पर्यटनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कमीत कमी बजेटमध्ये पर्यटनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी भंडारदरा हे ठिकाण खूप महत्वपूर्ण आहे.

5- महाबळेश्वर- महाबळेश्वर हे राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि सगळ्यांना माहिती असलेले पर्यटन स्थळ असून हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेले अनेक नयनरम्य दृश्य मनाला भुरळ घालतात. महाबळेश्वर येथील चायनामन फॉल्स, महाबळेश्वर मंदिर तसेच धोबी फॉल, वेन्ना लेक, प्रतापगड किल्ला आणि टायगर स्प्रिंग इत्यादी ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असून पर्यटन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

Leave a Comment