खुशखबर ! ‘या’ सरकारी स्कीममधून मुलींना मिळणार 70 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Scheme : शासनाच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर केंद्र शासनाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक विशेष बचत योजना देखील सुरू करण्यात आली आहे.

या योजनेला सुकन्या समृद्धी योजना असे नाव देण्यात आले आहे. ही भारत सरकारची एक महत्त्वाकांशी योजना असून या योजनेत मुलींच्या नावाने गुंतवणूक करता येते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, तिच्या लग्नासाठी आणि तिच्या एकंदरीत उज्वल भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल मोठी रक्कम तयार करायची असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायला काही हरकत नाही.

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही तुमच्या मुलींच्या नावे तब्बल सत्तर लाखापर्यंतचा फंड तयार करू शकता. दरम्यान आज आपण या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या नावे सत्तर लाख रुपयांचा फंड कसा तयार केला जाऊ शकतो, 70 लाख रुपये फंड तयार करण्यासाठी किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल याविषयी सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजना

2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही छोटी बचत योजना फक्त आणि फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींच्या नावाने अकाउंट ओपन केले जाऊ शकते.

या योजनेत जास्तीत जास्त पंधरा वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि सहा वर्षांचा लॉक इन पिरेड असतो. लॉक इन पिरेड हा असा कालावधी असतो ज्यामध्ये गुंतवणूक करावी लागत नाही मात्र गुंतवणूकदारांना व्याज मिळत राहते. पण या लॉक इन पिरेडमध्ये यातील पैसे मिळू शकत नाहीत.

समृद्धी योजनेतून किती व्याज मिळणार ?

या योजनेतील गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक 8.2 टक्के व्याजदर मिळत आहे. विशेष बाब अशी की, या गुंतवणुकीसाठी चक्रवाढ व्याज मिळत आहे. 

किती गुंतवणूक केली जाऊ शकते

या योजनेत वार्षिक अडीचशे रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. म्हणजे गुंतवणुकीची कमाल आणि किमान मर्यादा ठरवण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा कमी किंवा या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करता येणार नाही.

कसे मिळणार 70 लाख

समजा तुम्ही 2024 मध्ये तुमची मुलगी एक वर्षाची असताना या योजनेसाठी अकाउंट ओपन केले. त्यामध्ये तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक सुरू केली. जर तुम्ही पुढील पंधरा वर्षे या योजनेत गुंतवणूक कायम ठेवली तर 22 लाख 5 हजार रुपयांची तुमची गुंतवणूक होणार आहे.

दरम्यान या 15 वर्षाच्या गुंतवणुकीच्या काळात आणि पुढील सहा वर्षाच्या लॉक इन पिरेड मधील काळात तुम्हाला चक्रवाढ व्याजेचा फायदा मिळणार आहे. यावर तुम्हाला 47.3 लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे.

एकंदरीत तुम्हाला या योजनेतून तुमची गुंतवणूक आणि व्याज अर्थातच रिटर्न असे पकडून 69.8 लाख रुपयांचा फंड मिळणार आहे. ही रक्कम तुम्हाला मॅच्युरिटीच्यावेळी म्हणजेच 2045 मध्ये मिळू शकणार आहे. यातून तुम्ही तुमच्या मुलीचे उच्च शिक्षण किंवा तिच्या लग्नाचा खर्च सहज भागवू शकणार आहात. 

Leave a Comment