नॉन व्हेजिटेरियन लोक मोठ्या प्रमाणावर आहारामध्ये चिकनचा वापर करतात. आपण जेव्हा चिकन विकत आणतो तेव्हा बहुतेक आपण जेव्हा चिकन विकत घेतो तेव्हा ते आपल्या समोरच बऱ्याचदा कापले जाते व अशा वेळेस ते ताजे आहे की शिळे त्याबद्दल जास्त करून चिंता करण्याची गरज नसते.

परंतु बऱ्याचदा ऑनलाइन किंवा शॉपिंग मॉल मधून चिकन विकत घेतले जाते किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून आपण चिकन विकत घ्यायला गेलो तर आधीच कापून ठेवलेली चिकन त्या ठिकाणी असते व ते आपण विकत घेत असतो. परंतु अशा पद्धतीने जेव्हा आपण चिकन घेत होतो तेव्हा ते खरंच फ्रेश आहे का?

Advertisement

हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. नेमके चिकन फ्रेश आहे की नाही हे ओळखता येणे देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही चिकन खरेदी करताना काही गोष्टींचे व्यवस्थित निरीक्षण केले तर तुम्ही सहजतेने चिकन ताजे आहे की शिळे हे ओळखू शकतात. याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.

चिकन ताजे आहे की शिळे ओळखण्याच्या टिप्स

Advertisement

1- चिकनचा रंग पहा- जेव्हा आपण चिकन विकत घेतो तेव्हा त्याचा रंग पाहणे खूप गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने जेव्हा आपण ताजे चिकन घेतो तेव्हा त्याचा रंग फिकट गुलाबी असतो. परंतु जेव्हा चिकन शिळे होते किंवा खराब होते तेव्हा त्याचा रंग फिकट गुलाबी ऐवजी फिका पडतो. थोड्याफार प्रमाणात पिवळटपणा त्यामध्ये येतो. जर चिकनचा रंग जास्त प्रमाणामध्ये राखाडी दिसत असेल तर ते खराब आहे असे समजावे.

2- चिकनचा वासावरून ओळख- जर तुम्ही चिकनचा वास घेऊन पाहिला व त्यातून थोडाफार विचित्र स्वरूपाचा वास येत असेल तर ते खराब आहे असे समजावे. कारण बऱ्याचदा आपल्याला चिकनचा वास कसा असतो हे माहिती असते व फ्रेश चिकनचा वास हा सौम्य स्वरूपाचा असतो. परंतु त्या तुलनेमध्ये जर चिकन खराब असेल तर त्याचा वास हा आंबट तसेच तीव्र स्वरूपाचा व थोडाफार प्रमाणात सडल्यासारखा येतो.

Advertisement

3- चिकटपणा पहावा- जेव्हा आपण चिकनला हात लावतो आणि तेव्हा जर त्याच्यामध्ये चिकटपणा जाणवत असेल तर चिकन खराब आहे असे समजावे. घरी आणल्यानंतर ते धूतले व त्यानंतर देखील त्याचा चिकटपणा तसाच राहिला तर ते जास्त खराब झालेले आहे असे समजावे.

4- खाताना लागणारी चव- नॉनव्हेजिटेरियन जे व्यक्ती असतात त्यांना चिकनची चव कशी असते हे प्रामुख्याने माहिती असते. परंतु चिकन खाताना त्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळी चव जाणवली तर समजून घ्या कि ते चिकन ताजे नाही व खराब आहे.

Advertisement

फ्रीजमध्ये चिकन खराब झाले आहे हे कसे ओळखावे?

1- रंगातील बदल- फ्रिजमध्ये जर जास्त कालावधी करिता चिकन ठेवले तर ते खराब होऊ शकते. अशावेळी फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन तांबडे किंवा हिरवे झाले तर समजून घ्या की चिकन खराब झाले आहे.

Advertisement

2- वासावरून ओळख- जर फ्रीजमध्ये चिकन ठेवलेले आहे व त्याला दुर्गंधी येत असेल तर ते कुजले आहे असे समजावे व असे चिकन खाऊच नये. बऱ्याचदा आपण चिकन शिजवून फ्रिजमध्ये ठेवतो परंतु अशा वेळेस जर त्याला अमोनिया सारखा वास यायला लागला तर ते खराब झाले आहे असे समजावे.

3- रेक्चरमधील बदल- चिकन खराब झाले तर त्याच्या रेक्चरमध्ये देखील बदल होतो. अशा प्रकारचे चिकन तुम्ही धुतले तरी त्यामध्ये असलेली बॅक्टेरिया निघत नाहीत व एवढेच नाही ज्या भांड्यामध्ये तुम्ही चिकन धुतात ते देखील खराब होते किंवा दूषित होते. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या सोप्या गोष्टी पाहून चिकन ताजे आहे की शिळे हे ओळखू शकतात व होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतात.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *