JCB Mileage : येत्या दहा ते अकरा दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक जण नवीन वाहनाची खरेदी करणार आहेत. नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवीन वाहन खरेदी केले जाते.
याहीवर्षी अनेक जण नवीन वर्षाला नवीन वाहनाची खरेदी करणार आहेत. काही जण बाईक खरेदी करतील तर काहीजण कार खरेदी करतील. पण जेव्हाही आपण बाईक किंवा कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम ते वाहन किती मायलेज देते याविषयी जाणून घेतो.
गाडीचा लूक आणि परफॉर्मन्स हा त्यानंतरचा विषय असतो. जे वाहन चांगले मायलेज देत असेल तेच वाहन खरेदी करण्याला आपण विशेष पसंती दाखवत असतो.
मात्र तुम्ही कधी JCB ला किती मायलेज असते याविषयी विचार केला आहे का ? तुम्हाला जेसीबीला किती मायलेज असते हे माहितीये का ? कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल. मात्र तुम्ही जेव्हा-केव्हा जेसीबी पाहिले असेल तेव्हा नक्कीच जेसीबीला काय मायलेज मिळते हा विचार केला असेल.
अशा परिस्थितीत आज आपण जेसीबीला किती मायलेज असते किंवा एक तास जेसीबी चालवण्यासाठी किती लिटर डिझेल लागू शकते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर आपण ज्याला जेसीबी म्हणतो ते जेसीबी नसून अर्थमूवर आहे आणि जेसीबी ही अर्थमूवर बनवणारी एक नामांकित कंपनी आहे. पण या कंपनीचे अर्थ मूव्हर आपल्याकडे सर्वात जास्त विकले जात आहेत.
सर्वत्र जेसीबी कंपनीचे अर्थमूवरच पाहायला मिळतील. हेच कारण आहे की, अर्थमूवरला आपल्याकडे जेसीबी म्हणूनच ओळखले जात आहे. खरे तर आपण कार किंवा बाईक याचे मायलेज किलोमीटरनुसार काढत असतो.
म्हणजेच एका लिटर पेट्रोलमध्ये बाईक किती अंतर कव्हर करते हे त्याचे मायलेज असते. मात्र जेसीबीच्या बाबतीत तसं काही होऊ शकत नाही. कारण की हे वाहन अंतर कापण्यासाठी वापरले जात नसून खुदाई, लेव्हलिंग यांसारख्या अवजड कामांसाठी वापरले जाते.
यामुळे याचे मायलेज काढताना एक तास काम करण्यासाठी हे वाहन किती डिझेल खाते हे पाहावे लागणार आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, जेसीबी एक तास चालवले तर सरासरी पाच ते सात लिटर डिझेल त्याला लागते. मात्र जर काम अधिक अवघड असेल तर तासाला दहा लिटर पर्यंत देखील डिझेल लागू शकते.
याशिवाय याचा मेंटेनन्स खर्च हा अधिक आहे. जेसीबीचा मेंटेनन्स खर्च हा महिन्याकाठी दहा ते बारा हजाराच्या घरात असतो. म्हणजेच जेवढे मोठे हे वाहन आहे तेवढाच अधिक पैसा यासाठी खर्च करावा लागतो.