मोठी बातमी ! PM Kisan योजनेत महत्त्वाचा बदल, आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा लाभ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. ही योजना गरजवंत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला लाभ दिला जातो.

तसेच या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनाच मिळतो. दरम्यान या शेतकरी हिताच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. याचाच अर्थ ज्या शेतकऱ्याने जशी ही योजना सुरू झाली आहे तसा जर लाभ घेतला असेल तर सदर शेतकऱ्याला आतापर्यंत तीस हजार रुपये मिळाले असतील.

दरम्यान या योजनेचा पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित झाला असल्याने आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचे वेध लागले आहे. सोळावा हप्ता खात्यात केव्हा जमा होणार, मोदीचे 2000 आता केव्हा मिळणार हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.

म्हणजेच नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे देखील सांगितले गेले आहे की पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता सुरू होणार आहे. यामुळे या योजनेचा पुढील हप्ता हा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.

यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता नेमका केव्हा जमा होणार हे पाहणे विशेष खास राहणार आहे. अशातच मात्र पी एम किसान योजने संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता अर्थात 16 वा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीच्या नोंदीची पडताळणी पूर्ण झालेली असेल त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली असेल त्याच शेतकऱ्यांना पुढील हप्ता दिला जाणार आहे. म्हणजेच केवायसी आणि जमीन नोंदीची पडताळणी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली असेल अशाच शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे. यामुळे पुढील सोळाव्या हप्त्यापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केलेली नसतील त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता दिला जाणार नाही. म्हणून या योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठी घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना जर या योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा असेल तर लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

Leave a Comment