गव्हाच्या पिकाला पहिले पाणी केव्हा दिले पाहिजे ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. देशातील विविध भागांमध्ये रब्बी हंगामातील पीक पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा यांसारख्या मुख्य पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही गहू पेरला जात आहे.

खरे तर गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबर महिन्यात होते. मात्र ज्या शेतकऱ्यांना गहू पेरणी वेळेवर करता येत नाही ते शेतकरी बांधव डिसेंबर महिन्यात सुद्धा गव्हाची पेरणी करतात. गहू हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक असून या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत गव्हाच्या पिकाला पहिले पाणी केव्हा दिले पाहिजे हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण गव्हाच्या पिकाला पहिले पाणी केव्हा द्यावे याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गव्हाच्या पिकाला पहिले पाणी केव्हा दिले पाहिजे?

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या पिकाला पहिले पाणी पेरणीनंतर २१ किंवा २५ दिवसांनी दिले पाहिजे. तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जर या कालावधीमध्ये गव्हाला पहिले सिंचन मिळाले तर मुळांचा विकास चांगला होतो. मात्र असे असले तरी पिकाला पाणी देताना वेगवेगळ्या घटकांचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे जर पिकाची वाढ चांगली होत असेल.

तर गव्हाला पहिले पाणी 21 ऐवजी 25 किंवा 30 दिवसांनी दिले तरी सुद्धा गव्हाची चांगली जोमदार वाढ होते. मात्र जर पीक पिवळे पडले असेल आणि पिकाची मुळे कमकुवत झाली असतील तर तुम्ही पिकाला पहिले पाणी २१ दिवसांऐवजी १८ दिवसांनी दिले पाहिजे.

जर गव्हाची मुळे कमकुवत असतील तर लवकर पाणी दिले पाहिजे. यामुळे पिकाची मुळे खोलवर जातात अन पिकाची योग्य पद्धतीने वाढ होते. एकंदरीत हवामान आणि जमिनीच्या स्थितीनुसार तुम्ही गव्हाला पहिले सिंचन १८,२१, २५ किंवा ३० दिवसांत केव्हाही करू शकता.

Leave a Comment