फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘ही’ बँक देत आहे FD वर 8.50% व्याज, पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : भारतीय लोक सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व देतात. कष्टाने कमवलेला पैसा वाया जाऊ नये यासाठी आजही सेक्युर ठिकाणी गुंतवणूक केली जाते. यासाठी अनेकजण बँकेच्या एफडी मध्ये पैसे लावत असतात.

अलीकडे तर महिला वर्ग देखील एफडी करण्याला महत्त्व दाखवत आहे. चांगले व्याज आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे. खरंतर, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने गेल्या काही बैठकांमध्ये रेपो दर स्थिर ठेवला आहे.

ज्यावेळी रेपो दर वाढत असतो तेव्हा FD व्याजदर वाढतात आणि ज्यावेळी हा दर कमी होतो तेव्हा एफडीचे व्याजदर कमी होण्याची शक्यता असते. गेल्या काही बैठकांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. मात्र तरीही देशातील काही बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीचे व्याजदर वाढवत आहेत.

या यादीत IDFC फर्स्ट बँकेचे नावही जोडले गेले आहे. या बँकेने FD वरील व्याज दरात नुकत्याच काही दिवसांपूर्वी वाढ केली आहे. या बँकेने मार्च महिन्यात आपले एफडीचे व्याजदर सुधारित केले असून यानुसार आता या बँकेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल 8.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळू लागले आहे.

दरम्यान, आता आपण आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून कोणत्या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जात आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या कालावधीच्या FD साठी मिळतोय सर्वाधिक व्याजदर

मार्च 2024 मध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेने एफडी व्याजदरात बदल केले आहेत. तेव्हापासून IDFC फर्स्ट बँक एफडी साठी सर्वसामान्य नागरिकांना ३.० टक्के ते ८.० टक्के वार्षिक व्याज ऑफर करत आहे. त्याच वेळी, बँक सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज देत आहे.

बँक ज्येष्ठ नागरिकांना ३.५० ते ८.५० टक्के वार्षिक व्याज ऑफर करत आहे. 500 दिवसांच्या FD वर आयडीएफसी बँकेच्या माध्यमातून सर्वाधिक व्याज दिले जात असेल. या कालावधीच्या FD मध्ये जर एखाद्या सामान्य ग्राहकाने पैसा गुंतवला तर त्याला आठ टक्के या कमाल व्याजदराने परतावा मिळणार आहे.

तसेच जेष्ठ नागरिकांनी यात पैसा गुंतवला तर त्यांना 8.50% या वार्षिक व्याज दराने रिटर्न मिळणार आहेत. पण हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहेत. यापेक्षा अधिकच्या एफडीसाठी हे दर लागू राहणार नाहीत.

Leave a Comment