John Deere Tractor News : गेल्या काही दशकात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा मोठा वापर होऊ लागला आहे. यांत्रिकीकरणामुळे आता शेतीचा व्यवसाय आधीच्या तुलनेत निश्चितच सोपा झाला आहे. पूर्वी शेतीमधील जे काम करण्यासाठी मजुरांना एका दिवसाचा काळ लागायचा ते काम आता ट्रॅक्टर सारख्या यंत्रांच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटात पूर्ण होत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अधिकचे उत्पादन मिळत आहे. आता छोटा शेतकरी असो की मोठा शेतकरी शेती कामांसाठी ट्रॅक्टरचा प्रामुख्याने वापर करू लागला आहे. छोटे शेतकरी भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर लावत आहेत तर मोठे शेतकरी स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन शेतीची कामे करत आहेत. खरे तर देशात ट्रॅक्टरच्या अनेक कंपन्या आहेत.

Advertisement

जॉन डियर ही देखील देशातील एक प्रमुख ट्रॅक्टर निर्माती कंपनी नाही. या कंपनीने विविध ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. कंपनीचे जॉन डीअर 5205 हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे. देशभरातील हजारो, लाखो शेतकरी या ट्रॅक्टरचा वापर करत आहे. दरम्यान आज आपण या ट्रॅक्टरच्या विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जॉन डीअर 5205 ट्रॅक्टरच्या विशेषता

Advertisement

भारतातील शेतकऱ्यांमध्ये हा ट्रॅक्टर लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे हा ट्रॅक्टर शेतीकामांसाठी फारच उपयुक्त आहे. या ट्रॅक्टरमध्ये 2900cc क्षमतेचे तीन सिलेंडरचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 48 एचपीची पावर निर्माण करत आहे. याची विशेषता म्हणजे हे ट्रॅक्टर चांगले मायलेज देत आहे.

हे ट्रॅक्टर नांगरणी, रोटावेटरसारख्या विविध मशागतींच्या कामांसाठी फारच उपयुक्त आहे. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता म्हणजे लोडिंग क्षमता सोळाशे किलोग्रॅम एवढी आहे. त्यामुळे शेतमाल वाहून नेण्यासाठी हा ट्रॅक्टर खूपच उपयोगी येणार आहे. ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स हा 375 MM एवढा आहे.

Advertisement

याचे मिनिमम टर्निंग रेडियस 2900 एम एम एवढे आहे, यामुळे हा ट्रॅक्टर शेतात सहजतेने फिरवता येतो. याला पॉवर स्टेरिंग आहे. या ट्रॅक्टरला आठ पुढचे गेअर आहेत तसेच चार रिवर्स गिअर आहेत. कंपनीने या ट्रॅक्टरला 12 V ची 88 Ah बॅटरी दिलेली आहे. हा जॉन डीअर ट्रॅक्टर सिंगल/ड्युअल टाईप क्लचसह येतो आणि त्यात कॉलरशिफ्ट प्रकार ट्रान्समिशन आहे.

कंपनीच्या या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 32.39 किमी प्रतितास एवढा आहे. या ट्रॅक्टरचा रिवर्स स्पीड 14.9 किमी प्रतितास एवढा आहे. या ट्रॅक्टरमध्ये, ऑइल Immersed डिस्क ब्रेक मिळतात. यामुळे ओल्या जमिनीतही ब्रेकिंग सिस्टम चांगली राहते. कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये 2WD म्हणजेच टू व्हील ड्राइव्ह सिस्टम देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरचे पुढील टायर 7.50 x 16 चे आहेत.

Advertisement

तसेच मागील टायर हे 14.9 x 28 एवढे आहेत. कंपनी या ट्रॅक्टरसोबत JDLink सिस्टीम म्हणजेच अलर्ट मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग सिस्टीम देखील पुरवते, ज्याच्या मदतीने ट्रॅक्टरशी कुठेही, कधीही कनेक्ट होता येते. या ट्रॅक्टरला अतिशय चांगल्या दर्जाचे हेडलाइट्स देण्यात आले आहेत, यामुळे रात्रीच्या वेळीही शेतीची कामे सहज करता येतात.

ट्रॅक्टरची किंमत किती आहे बर?

Advertisement

या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 7.2 लाख ते आठ लाख रुपये एवढी आहे. शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरची ही एक्स शोरूम किंमत आहे ऑन रोड किंमत यापेक्षा अधिक राहते. जर तुम्हाला याची ऑन रोड किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या डीलर सोबत संपर्क साधावा लागणार आहे.

कंपनी या ट्रॅक्टर साठी 5000 तास आणि पाच वर्षपर्यंतची वॉरंटी देते. तुम्हाला या ट्रॅक्टरच्या सर्व विशेषतः, वॉरंटी आणि किंमत बाबत अधिक ची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जॉन डीअर च्या अधिकृत डीलर्सशी संपर्क साधू शकता.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *