काय सांगता ! जॉईंट होम लोन घेतल्यास तब्बल 7 लाख रुपये वाचतील, कसं ते पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Joint Home Loan Benefits : अलीकडे भारतात होम लोन घेऊन गृह खरेदीचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घर खरेदी करणे ही आयुष्यातील सर्वात मोठी अचीवमेंट आहे. यासाठी मात्र संपूर्ण आयुष्यभर कमावलेली जमापुंची खर्च करावी लागते. काहीजण घरासाठी होम लोन काढतात.

दरम्यान, जर तुम्ही नजीकच्या भविष्यात होम लावून घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण जॉईंट होम लोन घेतल्यास कशा पद्धतीने सात लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपण घरासाठी कर्ज घेणार असाल तर जॉईंट होम लोन घेतले पाहिजे. संयुक्त गृह कर्ज काढले तर तुम्हाला असंख्य बेनिफिट मिळतात. तुम्ही पत्नी किंवा कुटुंबाच्या कोणत्याही सदस्यासह संयुक्त गृह कर्ज घेऊ शकता.

जॉईंट होम लोन साठी अर्ज केल्यास तुम्हाला लवकरात लवकर होम लोन मंजूर होऊ शकते. जॉईंट होम लोन घेणाऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन उपलब्ध करून दिले जाऊ शकते.

याशिवाय जॉईंट होम लोन चा सर्वात मोठा फायदा म्हणजे अशा कर्जावर तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. जर पती-पत्नीसह संयुक्त गृहकर्ज घेतले असेल तर 7 लाखापर्यंतचा आयकर वाचवला जाऊ शकतो. दरम्यान आता आपण हे संपूर्ण कॅल्क्युलेशन अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जॉईंट होम लोन घेतल्या सात लाख रुपये वाचतील 

रियल इस्टेट मधील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त गृहकर्जाच्या बाबतीत, जॉईंट होम लोनचे फायदे आहेत. यातील सर्वात मोठा फायदा असा आहे की जॉईंट होम लोनवर 7 लाख रुपयांपर्यंतचा आयकर वाचवला जाऊ शकतो.

यात दोन्ही कर्जदार आयकर कायद्याच्या कलम 80C आणि कलम 24(b) अंतर्गत आयकर लाभांचा दावा करू शकतात. कलम 80C अंतर्गत, दोन्ही कर्जदार मूळ रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतात.

कलम 24(b) अंतर्गत, दोघेही रु. 2 लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर कपातीचा दावा करू शकतात.  अशाप्रकारे, अर्जदार कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजावर जास्तीत जास्त 3.50 लाख रुपये वजा करू शकतो आणि संयुक्त गृहकर्जाच्या बाबतीत, दोन्ही मिळून जास्तीत जास्त 7 लाख रुपयांची बचत करू शकतो.

यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी जॉईंट होम लोनचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Comment