Upcoming Car : आपल्यापैकी अनेकांचे नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल. या स्वप्नासाठी अनेकांनी पैशांची जमवाजमव सुरू केली असेल. काहींचे पैसे जमले असतील तर काही अजूनही कार घेण्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यात व्यस्त असतील. दरम्यान नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय कार मार्केटमध्ये काही कंपन्या नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आता आपण नजीकच्या भविष्यात कोणत्या कार लॉन्च होणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement

ह्युंदाई क्रेटा एन लाइन : Hyundai कंपनी बाजारात लवकरच एक नवीन कार लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे. कंपनी लवकरच नवीन ह्युंदाई Creta N Line प्रकार लॉन्च करणार अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी, Hyundai ने N-Line प्रकारात 120 प्रीमियम हॅचबॅक आणि व्हेन्यू सब-4 मीटर SUV लाँच केली आहे.

नवीन-जनरल स्विफ्ट : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. दरम्यान ही देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्विफ्टचे अपडेटेड वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.

Advertisement

नवीन स्विफ्टमध्ये उच्च इंधन कार्यक्षमतेसह नवीन Z मालिका 1.2 लिटर 3-सिलेंडर इंजिन मिळू शकते. हे इंजिन सौम्य हायब्रिड सेटअपसह दिले जाईल जे जास्तीत जास्त 83bhp पॉवर आणि 108Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा करण्यात आला आहे.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट : महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी लवकरच आपली बहुप्रतिक्षित कार XUV300 चे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणणार आहे. XUV300 चे फेसलिफ्ट वर्जन कंपनीकडून लवकरच लॉन्च केले जाईल असे बोलले जात आहे. दरम्यान या नव्याने लॉन्च होणाऱ्या कार मध्ये ग्राहकांना अद्ययावत बंपर आणि हेडलॅम्प असेंब्ली री-डिझाइन केलेल्या ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Advertisement

त्याच वेळी, कारच्या आतील भागात 10.25-इंच स्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, कूल्ड सीट्स, मागील एसी व्हेंट आणि नवीन लुक डॅशबोर्ड दिला जाईल असे मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *