Kharif Pik Vima : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मार्च महिन्यात या सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली.
यात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान नीधी योजना सुरु करणे आणि शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देणे या दोन महत्त्वाच्या योजनांची घोषणा झाली. दरम्यान एक रुपयात पिक विमा या योजनेचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे.
या योजनेची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून होणार आहे. अर्थातच आता पिक विम्याची शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम महाराष्ट्र राज्य शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे.
खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी एक रुपयात पिक विमा योजना लागू राहणार आहे. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामासाठी एक जुलै 2023 पासून पिक विमा काढायला सुरुवात झाली आहे. तसेच 31 जुलै 2023 पर्यंत खरीप हंगामातील पिक विमा काढता येणार आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढून घ्यावा असे आवाहन केले आहे.
दरम्यान आज आपण पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील. कोणत्या पिकासाठी शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाईची रक्कम मिळेल. तसेच आधी शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी किती रक्कम भरावी लागत होती? यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या कागदपत्रांची आवश्यकता भासणार?
पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना 1) सातबारा उतारा, खाते उतारा 2) बँकेच्या पासबुकची झेरॉक्स 3) आधार कार्ड 4) घोषणा पत्र यांसारखी कागदपत्रे लागणार आहेत.
ऑनलाइन अर्ज कुठे करावा लागणार
एक रुपयात पिक विम्यासाठी सेतू सुविधा केंद्रावरून पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
नुकसान भरपाई किती मिळणार?
एक रुपया पिक विमा योजनेअंतर्गत कापूस – चाळीस हजार, मका – 26,200 , सोयाबीन – 38 हजार, ज्वारी -24 हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मिळू शकते.
आधी पिक विमा साठी किती रक्कम भरावी लागत
आधी शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी खालीलप्रमाणे रक्कम भरावी लागत
ज्वारी 480 रुपये
बाजरी 400 रुपये
कापूस 2 हजार
सोयाबीन 720 रुपये
उडीद 400 रुपये
मका 524 रुपये
मूग 400 रुपये