Kisan Credit Card : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. केंद्र शासन आपल्या स्तरावर आणि राज्य शासन आपल्या स्तरावर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.
यामध्ये किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा देखील समावेश होतो. ही एक केंद्रातील सरकारकडून चालवली जाणारी केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अल्पशा व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते.
या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज मिळते. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल या योजनेतून उपलब्ध होत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची राहिली आहे. मात्र आता या योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.
या नवीन अपडेट नुसार सरकारने देशातील काही लोकांचे किसान क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचलला आहे. यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला असून अशा लोकांचे किसान क्रेडिट कार्ड रद्द केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर एकापेक्षा अधिक किसान क्रेडिट कार्ड आहेत अशा शेतकऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशा लोकांचे किसान क्रेडिट कार्ड तर रद्द केले जाणारच आहे शिवाय या लोकांवर कायदेशीर कारवाई होणार आहे तसेच संबंधित बँकेवर देखील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच निर्गमित झाल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. सध्या भारतातील प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आधारशी संलग्न केले जात आहे.
दरम्यान या आधार लिंकिंगमुळेच एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक किसान क्रेडिट कार्ड असल्याचे उघडकीस आले आहे. देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या बँकांकडून एकापेक्षा अधिक किसान क्रेडिट कार्ड बनवले आहेत. यामुळे मात्र पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत नाहीये.
खरंतर किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत एका व्यक्तीला फक्त एकच किसान क्रेडिट कार्ड बनवता येते. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याबाबतचा नियम तयार केला आहे. मात्र या नियमांना पायमल्ली तुडवत अनेक शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक किसान क्रेडिट कार्ड काढले आहेत आणि यामुळे इतर पात्र शेतकरी सदर योजनेपासून वंचित राहत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली आहे.
यामुळे आता सरकार ॲक्शन मोडमध्ये आले असून ज्या शेतकऱ्यांकडे एकापेक्षा अधिक किसान कार्ड आहेत त्यांचे किसान क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सध्या शासन स्तरावर जोरदार कार्य सुरू असून लवकरच या लोकांची यादी तयार केली जाणार आहे.