मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक जाहीर ! गाडी केव्हा धावणार, कुठे राहणार थांबे? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Konkan Railway : मुंबईसह कोकणातील रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून कोंकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची आतुरता लागून आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही हायस्पीड ट्रेन चालवली जाणार आहे. खरंतर मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस तीन जूनला सुरू होणार होती.

तसेच ही गाडी पाच जून पासून नियमित सेवेत धावणार होती. मात्र ओडिशा येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे या गाडीच्या उद्घाटनाचा सोहळा हा रद्द करण्यात आला. दरम्यान आता या गाडीच्या उद्घाटनाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. ती म्हणजे या गाडीचे उद्घाटन 26 जूनला होणार आहे.

26 जून रोजी सोमवारी म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 26 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथे जाणार असून भोपाळ येथेच मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

विशेष बाब अशी की, यावेळी एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेसला मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्याचे नियोजन आहे. मुंबई-मडगाव, बंगळुरु-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळा-इंदोर, भोपाळ जबलपूर या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला या दिवशी सुरु केले जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत तसेच थांब्यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही गाडी सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी मडगाव कडे रवाना होणार आहे आणि ठाण्याला 6 वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार आहे, पनवेलला सहा वाजून 40 मिनिटांनी, खेडला आठ वाजून 40 मिनिटांनी, रत्नागिरीला दहा वाजता आणि मडगावला एक वाजून 25 मिनिटांनी ही गाडी पोहोचणार आहे. तसेच ही गाडी मडगाव येथून दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे रवाना होईल आणि रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी ती सीएसएमटीला पोहोचणार आहे. मात्र ही गाडी शुक्रवारी धावणार नाही. तसेच मान्सून काळामध्ये केवळ तीनच दिवस ही गाडी चालवली जाणार आहे. 

सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे थांबे खालीलप्रमाणे

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला या रेल्वे मार्गावरील दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकणवली, थिविम या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. 

Leave a Comment