Konkan Railway News : या चालू वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली.
तदनंतर मार्च महिन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई येथे कोकणातील काही आमदारांना कोकण रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे आश्वासन दिले. मुंबई ते गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही देशातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी गाडी चालवली जाईल असं दानवे यांनी त्यावेळी सांगितलं.
मात्र त्यांनी ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत कोणतीच अपडेट दिलेली नव्हती. मात्र रेल्वे राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला जात होता. यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान या ट्रेनचे ट्रायल रन कम्प्लीट करण्यात आले.
ट्रायल रन यशस्वीरीत्या कम्प्लीट झाल्यानंतर तीन जून 2023 रोजी या वंदे भारत ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्याचे ठरले. यासाठी कोकण रेल्वेने सर्व आवश्यक पूर्वतयारी करून घेतली होती. मात्र तीन जूनला होणारा हा लोकार्पण सोहळा ओडिशा येथील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र आता रद्द झालेला लोकार्पणाचा सोहळा 27 जून 2023 रोजी होणार आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 27 जूनला सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. मात्र या दिवशी फक्त मुंबई ते गोवा ही एकच वंदे भारत ट्रेन सुरू होणार नसून तब्बल पाच वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.
सीएसएमटी ते मडगाव, बंगळुरू ते धारवाड, पटना-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ जबलपूर या पाच मार्गावर 27 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भोपाळ येथून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. अशातच मात्र मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
यामुळे रेल्वे प्रवाशांना या गाडीचा प्रवास परवडणार नाही असे बोलले जात आहे. खरंतर मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर समोर आले आहेत. जें की मुंबई ते गोवा विमान तिकीट दरापेक्षा अधिक आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर परवडतील का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण या ट्रेनचे तिकीट दर नेमके किती आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.
किती असणार तिकीट
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस चे कारचे तिकीट दर 990 रुपये आहेत तर व्हिस्टाडोम कोचेचे 2495 रुपये तिकीट आहे. तसेच तेजस एक्सप्रेसच्या तिकीट दराचा विचार केला तर एसी चेअर कारचे तिकीट 1610 रुपये, एसी एक्झिक्युटिव्ह कोच 3130, एक्झिक्युटिव्ह व्हिस्टाडोम कोचचे 2915 चे तिकीट आहे.
मात्र वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर हे जनशताब्दी पेक्षा अधिक आहेत आणि तेजस पेक्षा कमी आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट हे एसी चेअरकारसाठी 1495 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह साठी साठी 2915 एवढे राहणार आहेत.