अखेर तलाठी भरतीची जाहिरात निघाली; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharati 2023 : राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या नवयुवक तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे तरुण गट क संवर्गासाठी तयारी करत असतील अशा तरुणांसाठी ही आनंद वार्ता राहणार आहे.

कारण की, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या तलाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 4 हजार 644 पदांसाठी ही जाहिरात काढण्यात आली आहे. महसूल व वन विभागाच्या माध्यमातून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरतीच्या जाहिराती बाबत सोशल मीडियामध्ये अफवांचा बाजार उठला होता. विशेष बाब अशी की अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि नामांकित न्युज वेबसाईटवर देखील तलाठी भरतीची फेक जाहिरात वायरल झाली होती.

यामुळे तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र आता तलाठी भरतीची जाहिरात ही खरोखरच निघाली आहे. यामुळे तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

अर्जप्रक्रियेला केव्हा होणार सुरवात?

मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी पदभरतीसाठी अद्याप अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. पण येत्या दोन दिवसात मात्र अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 26 जून 2023 पासून इच्छुक उमेदवारांना यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज हा mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरता येणार आहे.

उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यासाठीची परीक्षा देखील ऑनलाईनच होणार आहे. परीक्षेची दिनांक ही नंतर विद्यार्थ्यांना mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच त्यांच्या हॉल तिकीटवर परीक्षेचे दिनांक नमूद केलेली राहणार आहे.

परीक्षा फी किती असणार?

यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये एवढी फी भरावी लागणार आहे. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये एवढी फी भरावी लागणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन कम्प्युटरवर घेतली जाणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. एका पेक्षा जास्त सत्रात ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या राहणार आहेत.

Leave a Comment