Lightning Viral News : नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मानसून 2023 आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. देशातील काही भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. काही भागांमधून सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. तूर्तास मात्र महाराष्ट्रात मोसमी पाऊस सुरू आहे.
अजून महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतलेली नाही. हवामान खात्याने 10 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. या पावसाळ्यात मात्र अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्यात आणि यामुळे विविध ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी, गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील चौपाटीवर एका व्यक्तीच्या अंगावर विज पडून मृत्यू झाला. खरतर, वीज पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे. मात्र या घटनेबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज देखील पहावयास मिळतात.
अनेकांना असे वाटते की जे व्यक्ती पायाळू जन्मतात अशा व्यक्तींवर पावसाळ्यात वीज पडण्याची शक्यता अधिक असते. काही लोक तर असे म्हणतात की जिथे विज पडते तिथे पायाळू लोक असतात म्हणूनच वीज पडते. अशा परिस्थितीत आज आपण यामागील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पायाळू जन्मलेल्या व्यक्तीच्या हातात किंवा पायात तांब्याचे कडे घातले जाते. आता जो व्यक्ती पायाळू जन्माला आला आहे अशा प्रत्येकच व्यक्तीच्या हातात तांब्याचे कडे असते. यामुळे अशा व्यक्तींकडे वीज आकर्षित होते.
म्हणजेच पायाळू जन्मलेल्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडते असे नाही तर त्या व्यक्तीने हातात तांब्याचे कडे घातलेले असते यामुळे त्यांच्याकडे वीज मोठ्या प्रमाणात आकर्षित होते.
तज्ञांनी फक्त पायाळू असल्याने अंगावर वीज पडत नाही असे यावेळी सांगितले आहे. तसेच जाणकार लोकांनी जर गावातील मंदिराचा कळस हा कांसे धातूपासून बनवलेला असेल तर अशा ठिकाणी वीज पडण्याच्या घटना कमी घडतात असा दावा केला आहे.