LPG Gas Cylinder Connection : तुमच्याही घरात गॅस कनेक्शन आहे ना ? अहो मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस ग्राहकांना एलपीजीचा अखंडीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आता ई-केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर करावी लागणार आहे.
यामुळे तुम्हीही जर अद्याप हे काम केलेले नसेल तर लवकरच तुम्ही तुमच्या गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी करून घ्या. पेट्रोलियम कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शन चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कदाचित तुम्हालाही हे निर्देश मिळालेले असतील. यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नजीकच्या गॅस वितरकाशी संपर्क साधून ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. पहिल्या टप्प्यात उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
आता इतर अन्य सामान्य ग्राहकांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जर केवायसीची प्रक्रिया केली नाही तर काय कारवाई होणार असा देखील प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की केवायसी न केल्यास, सबसिडी समाप्त करण्याव्यतिरिक्त, कनेक्शन ब्लॉक करण्याचा निर्णय संबंधित पेट्रोलियम कंपनी घेऊ शकते. अर्थातच केवायसीची प्रक्रिया केली नाही तर गॅस कनेक्शन ब्लॉक केले जाऊ शकते. असे झाल्यास घरगुती गॅस ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.
उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांचे ई-केवायसी पूर्ण
केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करत उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी सर्वप्रथम ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. यामुळे सदर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदानाची रक्कम बँक खात्यावर अखंडपणे पाठवणे शक्य झाले आहे.
एकंदरीत गॅस कनेक्शन साठी ई केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक आहे. हे काम ज्यांनी केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
एका वर्षात फक्त 15 सिलेंडर मिळणार
घरगुती गॅस ग्राहकाला एका वर्षात किती सिलेंडर मिळतात असा प्रश्न उपस्थित होत होता ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की घरगुती गॅसच्या एका कनेक्शनला एका वर्षात फक्त 12 सिलेंडर दिले जातात.
तथापि जर एखाद्याला अतिरिक्त सिलेंडरची आवश्यकता भासली तर त्याला अतिरिक्त तीन सिलेंडर दिले जाऊ शकतात. म्हणजेच एका ग्राहकाला एका वर्षात जास्तीत जास्त 15 सिलेंडर मिळू शकतात.
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या ग्राहकांसाठी हा कोटा ठरवून दिलेला आहे. यापेक्षा जास्त गॅस सिलेंडर त्यांना मिळतं नाहीत. तसेच यापैकी फक्त 12 सिलेंडरवर अनुदान मिळते आणि वरील तीन सिलेंडरवर कोणत्याच प्रकारची सबसिडी सुद्धा मिळत नाही.