पुणेकरांसाठी गुड न्यूज, ‘या’ महिन्यात सुरू होणार पुणे रिंग रोडचे काम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतेय ही वास्तविकता आहे. यामुळे शिक्षणाचे माहेरघर आयटी हब आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर अलीकडे वाहतूक कोंडी साठी विशेष कुख्यात बनत आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान पुणेकरांची हीच अडचण ओळखून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोड चे काम हाती घेतलेले आहे. या रिंग रोड प्रकल्प अंतर्गत 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 किलोमीटर रुंदीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम एकूण दोन टप्प्यात होणार आहे.

पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात हा प्रकल्प विभागला गेला आहे. सध्या स्थितीला पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामासाठी निविदा सादर करण्याची मुदतही आता संपलेली आहे. कालपर्यंत या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा सादर करण्याची मुदत कंपन्यांना होती.

यानुसार निविदा सादर झालेल्या आहेत आता पुढील दोन महिने या निविदांची छाननी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने पश्चिम भागातील रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम 90% झाल्यास जूननंतर या प्रकल्पाच्या कामासाठी नियुक्त झालेल्या कंपनीला कार्यादेश दिले जातील असे म्हटले आहे.

या प्रकल्पाचे काम एकूण नऊ पॅकेज मध्ये केले जाणार आहे. यातील पाच पॅकेज पश्चिम भागात आहेत आणि चार पॅकेज पूर्व भागातील आहेत. यासाठी 17,500 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकल्पासाठीची निविदा सादर करण्याची अंतिम मुदत काल अर्थातच 5 एप्रिल 2024 ला संपली आहे.

यामध्ये 19 कंपन्या पात्र ठरलेल्या आहेत. वेगवेगळ्या पॅकेज मध्ये काम केले जाणार असल्याने या प्रकल्पाचे काम जलद गतीने होईल अशी आशा आहे. दरम्यान जून नंतर या प्रकल्पाचा प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊ शकते अशी आशा रस्ते विकास महामंडळाकडून व्यक्त होऊ लागली आहे. म्हणजेच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्पाची भूसंपादनाची सद्यस्थिती 

पुणे रिंग रोड हा राज्य शासनाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ पूर्ण करणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 28 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये बांधकाम आणि भूसंपादनाच्या खर्चाचा समावेश आहे. पश्चिम भागातील जवळपास 90 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे पश्चिम भागातील काम जुन नंतर सुरू होईल अशी शक्यता आहे. दुसरीकडे, पूर्व भागातील रिंग रोड साठी देखील आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कामानेही आता गती पकडली आहे. पूर्व भागातील खेड, मावळ, हवेली या तालुक्यात निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. पूर्वेकडील रिंग रोड साठी आत्तापर्यंत 40% जमिनीचे संपादन पूर्ण झालेले आहे.

तसेच 70% भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात 1298 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यानुसार आत्तापर्यंत पश्चिमेकडील 592 हेक्टर आणि पूर्वेकडील 395 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झालेले आहे.

यासाठी 5350 कोटी 77 लाख रुपयांचा मोबदला निधी संबंधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. सध्या स्थितीला फक्त 562.49 हेक्टर जमिनीचे करारनामे झालेले आहेत आणि करारनामा झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना 2754 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Leave a Comment