LPG Gas Cylinder Price : गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना घर खर्च भागवणे देखील अशक्य होऊ लागले आहे. अशातच मात्र सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाले आहेत.
यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने महिला दिनाचे औचित्य साधून घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता.
14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर महिला दिनाच्या दिवशी शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आर्थिक राजधानी मुंबईत आता 14 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 802.50 रुपयांना मिळत आहे.
अशातच मात्र आज एक एप्रिल 2024 पासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. आज पासून 2024-25 हे नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे.
दरम्यान या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या 19 किलोच्या सिलेंडरची किंमत ३०.५० रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. तसेच बदललेली किमत आजपासून लागू राहणार आहे.
19 किलोच्या व्यवसाय गॅस सिलेंडरची नवी किंमत
राजधानी मुंबईत आता व्यावसायिक सिलिंडर १७१७.५० रुपयांना, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १७६४.५० रुपये, कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडर १८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये १९३० रुपयांना उपलब्ध होणार आहे.
खरेतर या आधी सलग दोन महिने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. फेब्रुवारीत या गॅस सिलेंडरची किंमत 14 रुपयांनी वाढली होती, मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमत 24.50 रुपयांनी वाढल्या होत्या.
आज मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडर 30.50 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय झालेला आहे. याचा सर्वसामान्यांना थेट फायदा होणार नाही मात्र यामुळे सर्वसामान्यांच्या बाहेर खाणे पिणे स्वस्त होईल.
अप्रत्यक्षरीत्या का होईना याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या चालू एप्रिल महिन्यातही कायम राहणार आहेत.