भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ? देशातील 5 सर्वात महाग शहरांमध्ये महाराष्ट्रातील 2 शहरांचा समावेश, पहा यादी….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India’s Expensive Towns : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट खूपच बिघडवले आहे. दरम्यान आज आपण भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ? देशातील पाच सर्वात महाग शहरे कोणती आहेत ? या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण ज्या शहरांविषयी जाणून घेणार आहोत त्यात महाराष्ट्रातील एका प्रमुख शहरांचा देखील समावेश आहे. या शहरांमध्ये सर्वसामान्यांना वास्तव्य करणे म्हणजेच खूपच अवघड बाब आहे.

शहरांमध्ये राहणे, फिरणे, खाणे, घर घेणे, शॉपिंग करणे, प्रवास, घरभाडे सर्वच महाग आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील 5 सर्वात महाग शहरे कोणती आणि या शहरांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश आहे.

राजधानी मुंबई : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ही महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी आहे. या शहराला स्वप्ननगरी, बॉलीवूड नगरी, मायानगरी अशा अनेक नावाने प्रसिद्धी मिळालेली आहे. पण या शहरात राहणे खूपच महाग आहे.

येथे राहणे, फिरणे, खाणे, घर घेणे, शॉपिंग करणे, प्रवास, घरभाडे अशा सर्वच गोष्टी इतर शहरांच्या तुलनेत महाग आहेत. देशातील सर्वात महाग शहरांच्या यादीत मुंबई शहराचा पहिला क्रमांक लागतो. हे देशातील सर्वात महागडे शहर आहे.

दिल्ली : भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली मुंबईनंतर देशातील सर्वात महाग शहर आहे. सर्वात महाग शहरांच्या यादीत या शहराचा दुसरा क्रमांक लागतो. येथे राहणे देखील सोपी बाब नाही. इतर शहरांच्या तुलनेत दिल्ली हे महाग असल्याचे आढळून आले आहे.

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नई हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते. विशेष बाब अशी की चेन्नई हे देशातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. महागड्या शहरांच्या बाबतीत देखील हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात महाग शहर बनले आहे. या शहराचे वैभव खरंच वाखाण्याजोगे आहे पण येथील महागाई देखील उल्लेखनीय आहे.

बेंगलोर : भारतातील सर्वात महाग शहरांच्या यादीत या शहराचा चौथा क्रमांक लागतो. बेंगलोर हे एक आयटी हब आहे. या शहराला देशातील पहिले आयटी हब म्हटले तरी चालेल. येथे आयटी क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे साहजिकच येथे पॉश सोसायटीज पाहायला मिळतात. यामुळे या शहरात महागाई देखील अधिक आहे. येथे घर भाड्याने घेणे तसेच घर विकत घेणे खूपच महाग आहे.

कोलकत्ता : कोलकत्ता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. काही वर्षांपूर्वी मात्र हे शहर भारताची राजधानी म्हणून ओळखले जात असे. साहजिकच या शहराचे महत्व दिल्ली आणि मुंबई पेक्षा कमी नाही.

त्यामुळे येथील महागाई देखील मुंबई आणि दिल्ली प्रमाणेच आहे. मुंबई आणि दिल्लीपेक्षा क्वचित हे शहर स्वस्त असू शकते. परंतु देशातील सर्वात महाग शहरांच्या यादीत या शहराचा पाचवा क्रमांक लागतो. 

Leave a Comment