पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन उड्डाणपूल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Bangalore National Highway : महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. अनेक नवीन महामार्ग तयार करणे प्रस्तावित आहे. तसेच काही महामार्गांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.

दुसरीकडे, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम येत्या काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच सुरत चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे चे काम सुद्धा सुरु होणार आहे.

तसेच काही महामार्गांच्या दुरुस्तीचे काम आणि विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे ते मुंबई दरम्यानच्या एक्सप्रेस वे चा विस्तार करणार आहे.

या एक्सप्रेस वे ची दोन्ही दिशेने प्रत्येकी एक लेन वाढवली जाणार आहे. याशिवाय पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कागल ते सातारा दरम्यानच्या मार्गाचे सहापदरीकरण करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. दरम्यान याच प्रकल्प अंतर्गत टोप गावात नवीन उड्डाणपूल विकसित होणार आहे. याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.

या ठिकाणी 350 मीटर लांबीचा उड्डाणपूल तयार होणार आहे. जाण्यासाठी एक आणि येण्यासाठी एक असे दोन उड्डाणपूल या ठिकाणी तयार होणार आहेत. टोप बाजार कट्टा ते बिरदेव मंदिर या दरम्यान हे दोन उड्डाणपूल विकसित होणार आहेत.

खरे तरच जेव्हा हा महामार्ग चार पदरी झाला तेव्हाच या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु जेव्हा हा मार्ग सहा पदरी बनवला जाईल तेव्हा या ठिकाणी उड्डाणपूल बनवू असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.

यानुसार आता या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याचे काम सुरू झाले आहे. रोडवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हे काम सुरू केले आहे. हा उड्डाणपूल बारा खांब अर्थातच पिलर उभे करून बनवला जाणार आहे.

स्थानिक लोकांसाठी सेवा मार्ग आणि ज्योतिबा डोंगर, कासारवाडी, सादळे मादळे, पन्हाळा येथे जाण्यासाठी या उड्डाणपुलाखालून रस्ता राहणार आहे. या उड्डाणपुळामुळे या ठिकाणी होणाऱ्या अपघातांच्या संख्येत मोठी घट येणार आहे.

यामुळे येथील ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. उड्डाणपुलाची मागणी गेल्या वीस वर्षांपासून केली जात आहे. आता मात्र ही मागणी हा रस्ता सहा पदरी होत असल्याने पूर्ण केली जाणार आहे.

Leave a Comment