LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडरच्या किमती देखील गेल्या काही वर्षांमध्ये विक्रमी वाढल्या आहेत.
मात्र आता निवडणुकीच्या रणधुमाळीत गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. मे महिन्याची सुरुवातीलाच तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती रिवाईज केल्या जातात.
यानुसार मे महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील किमती सुधारित केल्या गेल्या आहेत. खरेतर गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात देखील गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. गेल्यावेळी व्यवसायिक म्हणजेच 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या.
यावेळीही १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरु आहेत आणि या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईत सिलिंडरच्या किमती १९ ते २० रुपयांनी कमी झाल्या असल्याचे वृत्त हाती आले आहे. IOCL च्या वेबसाइटवर नवीन सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या गेल्या आहेत, ज्या आजपासून अर्थातच 1 मे 2024 पासून लागू झाल्या आहेत.
किती कमी झालेत या सिलेंडरचे दर
मिळालेल्या माहितीनुसार, 1 मे पासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी झाली आहे आणि त्याची किंमत 1764.50 रुपयांवरून 1745.50 रुपयांवर आली आहे. आहे. त्याचप्रमाणे, मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1717.50 रुपयांवरून 1698.50 रुपयांवर आली आहे.
चेन्नईमध्येही हा सिलेंडर १९ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १९३० रुपयांवरून १९११ रुपयांवर आली आहे. परंतु पश्चिम बंगाल राज्यातील कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत 20 रुपयांनी कमी झाली आहे, येथे आतापर्यंत 1879 रुपयांना विकला जाणारा हा 19 किलोचा सिलेंडर आजपासून 1859 रुपयांना विकला जाणार आहे.
तेल विपणन कंपन्यांनी फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती अजूनही कायमच आहे. यामुळे सर्वसामान्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. तथापि अप्रत्यक्षरीत्या का होईना पण या निर्णयाचा सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.