घर किंवा जमीन खरेदी करत असाल तर ‘हे’ महत्त्वाचे डॉक्युमेंट नक्कीच चेक करा ! नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property News : तुम्हीही नजीकच्या भविष्यात घर किंवा जमीन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात घर किंवा जमीन खरेदी केली जात आहे. पण कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

नाहीतर प्रॉपर्टी खरेदी करताना फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. यामुळे कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना त्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक असते.

दरम्यान आता आपण नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना त्या प्रॉपर्टीचे कोणते डॉक्युमेंट तपासले पाहिजेत जेणेकरून फसवणूक होणार नाही याविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रॉपर्टी खरेदी करताना कोणते कागदपत्र तपासले पाहिजेत?

चॅनल डॉक्युमेंट : तुम्ही जर नवीन प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर त्या प्रॉपर्टीचे चॅनल डॉक्युमेंट तपासणे खूपच महत्वाचे असते. चॅनल डॉक्युमेंट म्हणजे ती प्रॉपर्टी आधी कोणा-कोणाला हस्तांतरित झाली आहे, त्या व्यवहारांचे डॉक्युमेंट असते. त्या प्रॉपर्टीच्या आधीच्या व्यवहारांचे कागदपत्रे म्हणजे चॅनेल डॉक्युमेंट योग्य पद्धतीने चेक करणे आवश्यक असते.

बोजा प्रमाणपत्र : याला इंग्रजीत एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट असं म्हणून ओळखलं जातं. हे प्रमाणपत्र सदर मालमत्तेवर तारण, बँक कर्ज आणि कराची थकबाकी याबाबतची माहिती दर्शवत असते.यात सदर मालमत्तेवर काही दंड तर लावलेला नाही ना, याची देखील माहिती असते. हे प्रमाणपत्र तुम्ही रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म क्रमांक 22 भरून मिळवू शकता.

भोगवटा प्रमाणपत्र : याला इंग्रजीत ऑक्यूपॅन्सि सर्टिफिकेट असं म्हणून ओळखले जाते. भोगवटा प्रमाणपत्र हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट तुम्ही ज्या बिल्डर कडून घर किंवा जमीन खरेदी करणारा असाल त्याकडून प्राप्त करणे आवश्यक असते. नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना भोगवटा प्रमाणपत्र जरूर घ्या.

ताबा पत्र : प्रॉपर्टी डेव्हलप करणारा बिल्डर किंवा विकासक ताबा पत्र जारी करत असतो. जो नवीन प्रॉपर्टी खरेदी करतो त्या खरेदीदाराला विकासकाकडून हे ताबा पत्र दिले जाते. याला इंग्रजीत पझेशन लेटर असे नाव आहे. हे डॉक्युमेंट मालमत्ता खरेदी करतांना महत्वाचे ठरत असते. या डॉक्युमेंट मध्ये मालमत्तेचा ताबा मिळाल्याची तारीख असते.

म्हणजे तुम्हाला सदर प्रॉपर्टीचा ताबा जेव्हा मिळेल ती तारीख यामध्ये नमूद असते. जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गृह कर्ज घेणार असाल तर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतेच. पण, जोपर्यंत OC मिळत नाही, तोपर्यंत मालमत्तेचा ताबा मिळण्यासाठी केवळ ताबा पत्र पुरेसे मानले जाऊ शकत नाही.

Leave a Comment