मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार ? दर कमी होणार की वाढणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या एक जूनला सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 04 जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

4 जूनला सत्ताधारी पुन्हा सत्ता काबीज करतात की विपक्ष मोठा उलटफेर करणार हे समजणार आहे. मात्र अशातच मीडिया रिपोर्ट मध्ये चार जून नंतर गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा दावा केला जाऊ लागला आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. खरे तर गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गॅस सिलेंडरच्या किमतीत नेहमीच बदल केला आहे.

प्रत्येक निवडणुकांमध्ये मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती चेंज केल्या आहेत. निवडणुकीआधी सरकार गॅस सिलेंडरच्या किमती कमी करते आणि निवडणूक झाल्यानंतर गॅस सिलेंडरच्या किमती वाढवते. आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये सरकारने असेच केले आहे.

यामुळे यंदाही असेच होणार अशा चर्चा सध्या मीडिया रिपोर्ट मध्ये आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसणार, सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. 2014 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीत विना सबसिडी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 905 रुपये एवढी होती.

तसेच अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 414 एवढी होती. आज म्हणजेच 27 मे 2024 ला घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये एवढी आहे. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1745 रुपये एवढी आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक मे 2014 ला 928.50 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत होते.

दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मोदी सरकारने निवडणुकांआधी गॅस सिलेंडरची किंमत 712.50 रुपयांवर आणली. मात्र निवडणुकीनंतर यामध्ये मोठी वाढ झाली आणि गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपयांपर्यंत पोहोचली.

दरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकारने पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्यात आणि सध्या गॅस सिलेंडर 803.50 रुपयांना मिळत आहे. दरम्यान, आता लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किमती वाढतील असा दावा होऊ लागला आहे.

मोदी सरकारने आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात गॅस सिलेंडरच्या किमती नेहमीच निवडणुकांच्या आधी कमी केल्या आहेत आणि निवडणुका संपल्यानंतर पुन्हा किमती वाढवल्या आहेत. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतरही गॅसच्या किमती वाढू शकतात असे म्हटले जात आहे.

तथापि, या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही परंतु पुढल्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खरंच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

Leave a Comment