LPG Gas Cylinder Price : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते निवडणुकीत आपल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार करत आहे. महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशभरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षासहित विविध राजकीय पक्षांनी आपले घोषणापत्र देखील जारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वीच काही मोठे निर्णय देखील घेतले आहेत. यातीलच एक मोठा निर्णय म्हणजे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय.
खरंतर पीएम उज्वला योजना ही वर्तमान मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात झाली आहे. ही योजना 2016 मध्ये सुरू झाली आहे.
मोदी सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी योजनांमध्ये या योजनेचा समावेश होतो. याअंतर्गत आधी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपयांची सबसिडी दिली जात होती. मात्र सबसिडीच्या रकमेत नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये सबसिडीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडरवर 14.2 kg च्या गॅस सिलेंडर वर तीनशे रुपयांची सबसिडी देत आहे.
या अंतर्गत एका आर्थिक वर्षात 12 गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जाणार आहे. यापेक्षा जास्तीच्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळू शकत नाही. तसेच याचा लाभ फक्त आणि फक्त उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे.
खरेतर उज्वला योजनेअंतर्गत दिली जाणारी ही सबसिडी मार्च 2024 पर्यंतच दिली जाणार होती. मात्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून या सबसिडी योजनेला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
यानुसार आता या संपूर्ण आर्थिक वर्षात उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत सबसिडीचा लाभ दिला जाणार आहे.
अर्थातच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ही सबसिडी योजनेचा लाभ उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. परंतु हा लाभ फक्त 31 मार्च 2025 पर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर उज्वला योजनेअंतर्गत दिली जाणारी सबसिडी बंद केली जाऊ शकते.
किंवा मग सरकार त्यावेळी सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी या सबसिडी योजनेला आणखी मुदतवाढ देखील देऊ शकते. मात्र तूर्तास सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या अंतर्गत दिली जाणारी सबसिडी 31 मार्च 2025 पर्यंत मिळत राहणार आहे. तथापि, भविष्यात या सबसिडी योजनेला मुदतवाढ मिळते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.