महाराष्ट्रात वादळी पावसाचा कहर सुरूच ! ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचं भाकीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून ढगाळ हवामान, वादळी पाऊस अन गारपीटीच वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये तसेच विदर्भातील नागपूरमध्ये पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच महाराष्ट्रात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाले असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे.

एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे तर दुसरीकडे वादळी पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होणार आहे. राज्यातील विदर्भ विभागात आज गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज IMD ने दिला आहे. तसेच अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच आज ठाणे, मुंबई, पुणे या परिसरातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे.

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्यात 28 एप्रिल पर्यंत वादळी पाऊस बरसणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. या कालावधीत राज्यातील 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

या कालावधीत राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज यावेळी पंजाबरावांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा तसेच पशुधन देखील सुरक्षित ठिकाणी बांधावे असे आवाहन केले जात आहे.

खरे तर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून याचा परिणाम कृषी क्षेत्रावर पाहायाला मिळत आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे तथा मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होतय.

Leave a Comment