HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, बँकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ग्राहकांना काय लाभ मिळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank Special FD Scheme : एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टरमधील बँक आहे. भारतातील ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जात असतात. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर विविध कर्ज उपलब्ध करून देत आहे.

एचडीएफसी आपल्या ग्राहकांना होम लोन, पर्सनल लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर उपलब्ध करून देत आहे.

याशिवाय एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देखील दिला जात आहे. दरम्यान एचडीएफसी बँकेत एफडी करणाऱ्यांसाठी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेने आपल्या एका स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. यामुळे एचडीएफसी बँकेत एफडी करणाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्या स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूकीची तारीख वाढवली

एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून सिनिअर सिटीजन केअर एफडी ही विशेष एफडी योजना लाँच करण्यात आली आहे. ही विशेष एफडी योजना सिनिअर सिटीजन ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना सामान्य एफडीच्या तुलनेत अधिकचा परतावा दिला जातोय. या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर दिले जात आहे.

पाच कोटी किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या गुंतवणुकीसाठी हा व्याजदर लागू राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक या योजनेत किमान 5,000 रुपये आणि कमाल 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

या योजनेत किमान 5 वर्षे आणि 1 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. यात मासिक किंवा त्री मासिक व्याज दिले जाते.

दरम्यान आता याच विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेने या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दोन मे 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

म्हणजेच ज्या सीनियर सिटीजन ग्राहकांना या एफ डी योजनेत गुंतवणूक करायची असेल त्यांना आता दोन मे पर्यंत या एफ डी योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. निश्चितच सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी एचडीएफसी बँकेचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

Leave a Comment