एका तासाचा प्रवास फक्त 10 मिनिटात ! मुंबईहून कोकणात जाणे होणार सोयीचे, ‘हा’ बोगदा पुन्हा वाहतुकीसाठी सुरु होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रस्ते विकासाची विविध प्रकल्प पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे मुंबईमध्ये स्थायिक झालेले कोकणातील रहिवासी आता आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत.

उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी कोकणातील चाकरमानी आपल्या मूळ गावाकडे जात आहेत. याशिवाय सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी देखील मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावाला परतणार आहेत.

मात्र मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कशेडी घाटातील वळणावळणाच्या रस्त्याने जावे लागत आहे. त्यामुळे यांचा बहुमूल्य वेळ तर वाया जातच आहे शिवाय अपघाताची देखील भीती असते.

आता मात्र चाकरमान्यांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांच्या प्रवासाची गैरसोय होय नये म्हणून भुयारी मार्गातून दुहेरी वाहतूक सुरु होऊ शकते. खरे तर सध्या स्थितीला कशेडी घाटातील बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान आता निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावाकडे जाणार असल्याने राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कशेडी घाट येथे तयार होत असलेल्या बोगद्यातून पुन्हा वाहतूक सुरू होऊ शकते असे संकेत दिले आहेत.

त्यामुळे मुंबई ते गोवा महामार्गावरील प्रवास वेगवान होणार असून याचा कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कोकणवासीयांना कशेडी घाट अवघ्या 5 ते 7 मिनिटांत पार करता येणार आहे. या बोगद्यामुळे एका तासाचा प्रवास फक्त दहा मिनिटात पूर्ण होऊ शकतो अशी आशा व्यक्त होत आहे.

रिणामी प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. शिवाय कशेडी घाटातला वळणावळणाचा रिस्की प्रवास टळणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असणारा कशेडी घाट हा रायगडा आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडतो. या घाट सेक्शन मधला प्रवास मात्र मोठा रिस्की आहे. याला पर्याय म्हणून कशेडी घाटात बोगदा तयार केला जात आहे.

या बोगद्यासाठी 441 कोटी रूपयांची तरतूद करून देण्यात आली असून याचे काम 2018 मध्ये सुरू झाले आहे. कशेडी घाटात दोन बोगदे होत आहेत. यातील प्रत्येक बोगद्यात तीन लेन आहेत. यातील एकेरी मार्ग हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत आहे.

कोकणातून मुंबईला येणाऱ्यांसाठी भुयारी मार्गातून प्रवास करण्यासाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही. तथापि, या भुयारी मार्गातून मुंबईहून कोकणात जाण्यासाठी परवानगी आहे. पण, दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने मुंबईमधून कोकणात जाणाऱ्यांना अजूनही कशेडी टॅपमार्गे खेडकडे रवाना व्हावे लागत आहे.

मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुयारी मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू होऊ शकते असे म्हटले जात आहे. जर असे झाले तर निश्चितच मुंबईहून कोकणात आणि कोकणातून मुंबईला येणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment