LPG Price Will Decrease : गेल्या काही वर्षांपासून भारतात महागाईमुळे सर्वसामान्य जनता फार भरडली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः त्रस्त झाली आहे. पण आता नवीन वर्षात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
कारण की, नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. एक जानेवारी 2024 ला एलपीजी सिलेंडरचे दर सुधारित होणार असून एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होऊ शकतात असे बोलले जात आहे.
खरे तर 2019 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक मोठी भेट दिली होती. एक जानेवारी 2019 ला 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमती 120.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.
2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या यामुळे त्यावेळी केंद्र शासनाने हा निर्णय घेतला होता. दरम्यान, 2024 मध्ये देखील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
या निवडणुका नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच होणार आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
याबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आयोजित केल्या जाणार आहेत.
यामुळे, आधीचा पॅटर्न पाहिला असता केंद्र शासन 2024 च्या अगदी सुरुवातीलाच गॅस सिलेंडरच्या किमती कमी करू शकते असे मत व्यक्त होत आहे. खरे तर ऑगस्ट 2023 मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.
ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडर अकराशे रुपयाला मिळत होते. पण ऑगस्ट महिन्यात यामध्ये दोनशे रुपयांची घट झाली असल्याने सिलेंडरची किंमत 903 रुपये एवढी झाली आहे.
आता यामध्ये आणखी कपात होणार असा अंदाज आहे. यामुळे आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन खरंच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.