जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार ! ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस, पंजाबरावांचा मोठा दावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी मात्र काही दिवसांचा काळ बाकी आहे. येत्या दोन दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्ष 2024 ची सुरुवात अवकाळी पावसाने होऊ शकते असा अंदाज समोर आला आहे.

जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा हवामान अंदाज दिला आहे. खरे तर नोव्हेंबर महिन्याचा शेवट अवकाळी पावसाने झाला. यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली.

त्यानंतर मात्र दोन आठवडे महाराष्ट्रात जोरदार थंडी पाहायला मिळाली. कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक हवामान तयार झाले होते. पण आता उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे.

उत्तरेकडील राज्यात किमान तापमान वाढले असल्याने थंडी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील येणारे थंड वारे आता काहीसे कमी झाले आहेत. शिवाय दक्षिणेकडील राज्यांमधून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत.

यामुळे राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता तयार झाली आहे तसेच राज्यातील किमान तापमान कमी झाले असून याचा परिणाम म्हणून आता थंडीचा जोर कमी होऊ लागला आहे.

विशेष म्हणजे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

तीन जानेवारी ते सात जानेवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे. या कालावधीत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाची हजेरी लागणार असा अंदाज असल्याने नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार हे स्पष्ट होत आहे.

या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे.

यामुळे या संबंधित भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या रब्बी पिकांना यामुळे फटका बसू शकतो.

Leave a Comment