Lux Soap Success Story : तुम्हीही कधी ना कधी लक्स साबणाने आंघोळ केली असेल? बरोबर ना! लक्स हा साबणाचा असा ब्रँड आहे ज्याचा वापर भारतात फार पूर्वीपासून केला जातोय.
आपल्या आजोबा, पणजोबाच्या काळापासून या साबणाने आंघोळ केली जात आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागात या साबणाचा प्रामुख्याने वापर होतो. याच्या विना अनेकांची अंघोळ सुद्धा पूर्ण होत नाही.
या साबणाचा फ्रेग्रांस हा इतर साबणापेक्षा खूपच वेगळा आणि मनमोहक आहे. हेच कारण आहे की आजही अनेकजण या साबणाचा अंघोळीसाठी वापर करतात. लक्स साबणाच्या ॲडवटाईज मध्ये तुम्ही अनेक दिग्गज कलाकारांना पाहिले असेल.
बॉलीवूडचे अनेक हिरो आणि हिरोईन या ब्रँडच्या ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या आहेत. दरम्यान आज आपण याच लक्स साबणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. हा साबण एवढा मोठा ब्रँड कसा बनला? हा साबण कोणती कंपनी बनवते या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.
Lux साबण हिंदुस्तान लिव्हरचे प्रॉडक्ट आहे
लक्स साबण हा भारतासहित जगातील अनेक देशांमध्ये अंघोळीसाठी वापरला जातो. ब्रिटीश कंपनी युनिलिव्हरची उपकंपनी असलेल्या हिंदुस्तान लीव्हर हा साबण बनवते. हा साबणाचा एक जगप्रसिद्ध ब्रँड आहे. ज्याचा वापर प्रत्येक भारतीयाने केलेला असेल.
दोन भावांनी सुरु केली होती कंपनी
मीडिया रिपोर्ट नुसार, ही कंपनी दोन भावांनी सुरू केली होती. विल्यम लीव्हर आणि जेम्स डोर्सी लीव्हर या दोन बंधूंनी या कंपनीची सुरुवात केली. हा साबण 1885 मध्ये सर्वप्रथम बाजारात आणला गेला होता.
त्यावेळी लीव्हर ब्रदर्सच्या नावाने हा साबण बाजारात लॉन्च झाला होता. कंपनीच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये हा प्रॉडक्ट बाजारात आला होता. त्यावेळी ही कंपनी खूपच छोटी होती. पण नंतर याच साबणाच्या ब्रँडमुळे ही कंपनी मोठी झाली. ही कंपनी पुढे युनिलिव्हर म्हणून नावारूपाला आली आणि एक मल्टिनॅशनल कंपनी बनली. खरंतर सुरुवातीला हा साबण लॉन्ड्री मध्ये वापरला जात असे म्हणजेच हा साबण कपडे धुण्यासाठी वापरला जात होता.
आता जसे कपड्यांच्या साबणाचे विविध ब्रँड आहेत तसाच हा साबण सुरुवातीला कपड्यांचा साबण म्हणून बाजारात लॉन्च करण्यात आला होता. पण, हा कपड्यांचा साबण असला तरीदेखील त्यावेळी अनेक महिला याचा वापर आंघोळीसाठी करत असत. कंपनीला ही गोष्ट समजली आणि कंपनीने मग हाच साबण अंघोळीचा साबण म्हणून विकसित केला. या साबणात ग्लिसरीन आणि पाम तेल टाकून याचा सुगंध वाढवला गेला.
मग हा साबण टॉयलेट सोप म्हणून वापरला जाऊ लागला. ज्याला हनी सोप म्हणूनही ओळखले जात होते. परंतु नंतर त्याचे नाव बदलून सनलाइट करण्यात आले. हळूहळू कंपनीच्या या टॉयलेट सोपला खूप प्रसिद्धी मिळाली.
त्यानंतर पुन्हा याचे नाव चेंज करण्यात आले. याला लक्स असे नवीन नाव मिळाले. हे नाव खूप लवकर लोकांना आकर्षित करत होते. या नावाने जगभर हा ब्रँड प्रसिद्ध झाला. तेव्हापासून हा साबण बाजारात लक्स साबण म्हणूनच विकला जात आहे.
भारतात केव्हा आला होता हा साबण
हा साबण भारतात 1909 मध्ये दाखल झाला. त्यावेळी या साबणाला सनलाइट असेच नाव होते. तेव्हापासून हा साबण भारतात विकला जात आहे. हा साबणाचा ब्रँड भारतात खूपच प्रसिद्ध असून याचे मार्केट कॅप खूपच अधिक आहे.
आज या कंपनीचे व्हॅल्युएशन बिलियन मध्ये पोहचले आहे. संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणारा हा ब्रँड आपल्या भारतात देखील खूपच फेमस झाला असून एकेकाळी लॉन्ड्री मध्ये युज होणारा हा साबण आता प्रत्येक भारतीय आंघोळीसाठी वापरत आहे.