कर्नाटक बोर्डाचा 10वी चा निकाल जाहीर ! महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? समोर आली नवीन तारीख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra 10th And 12th Result Date : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून याचा रिझल्ट केव्हा जाहीर होणार हाच मोठा सवाल उपस्थित केला जात होता.

दरम्यान आता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी वर्गाच्या निकाला संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाला संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

यंदा या दोन्ही वर्गांचे निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतात याबाबत त्यांनी अपडेट दिली आहे. खरेतर आज अर्थातच 9 मे 2024 ला कर्नाटक बोर्डाचा दहावीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. यावर्षी 73.40% एवढा रिझल्ट लागला आहे.

कर्नाटक बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी साडेदहा वाजता हा रिझल्ट जाहीर केला आहे. बंगळूर येथील मल्लेश्वरम कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा मात्र निकालात घट आली आहे.

गेल्या वर्षी 83.89% एवढा निकाल लागला होता. यंदा यामध्ये घट आली असून 73.40% एवढाच रिझल्ट लागला आहे. तथापि यंदाही नेहमीप्रमाणेच मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा रिझल्ट हा चांगला लागला आहे.

विशेष म्हणजे बोर्डात पहिला क्रमांक देखील मुलीनेच पटकावला आहे. मेल्लिगेरी मोरारजी रेसिडेन्शिअल स्कूल, बागलकोटची विद्यार्थिनी अंकिता बसप्पा ही राज्यात ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून प्रथम आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान कर्नाटक बोर्डाचा दहावीचा निकाल लागला असल्याने आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार असून दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीच ही माहिती दिली आहे. एकंदरीत यावर्षी दहावी आणि बारावी वर्गाचे निकाल मे महिन्यातच लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची वाट पाहिली जात होती तो निकाल आता या महिन्याच्या अखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्थातच maharesult.nic.in या वेब साइटवर निकालाची लिंक सक्रिय करून दिली जाणार आहे. निकाल लागल्यानंतर या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून आपला निकाल पाहता येणार आहे.

Leave a Comment