ब्रेकिंग : यंदा दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यातच लागणार ! निकालाची तारीख काय ? बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board 10th And 12th Board Result Date : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे दहावी-बारावीच्या बोर्डच्या निकाला संदर्भात. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी बोर्डाची परीक्षा 1 ते 26 मार्च 2024 आणि बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीमध्ये घेतली.

परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना तथा त्यांच्या पालकांना निकालाची आतुरता लागली आहे. बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार हा सवाल पालकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा लागू शकतो याबाबत माहिती दिली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा दहावी तसेच बारावीचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल मे महिन्यातच जाहीर अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर राज्य मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात आणि 10 वी चा निकाल चौथ्या आठवड्यात जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. त्यांनी कोणत्या तारखेला निकाल लागणार हे तर सांगितले नाही मात्र मे महिन्यातच दोन्ही वर्गांचे निकाल लागतील हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे मे महिन्यातच दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर व्हावेत यासाठी राज्य मंडळाकडून दैनंदिन फॉलोअप सुरू असून, निकालाचे काम जलदगतीने करण्यासाठीच्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी माध्यमांना दिलेली आहे.

पुढील महिन्यात निकाल जाहीर होणार हे जवळपास आता फिक्स झालेले आहे यामुळे आता आपण दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल कसे पाहायचे हे देखील जाणून घेणार आहोत.

निकाल कसा पाहणार ?

बारावीचा तथा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर किंवा लॅपटॉपवर गुगलवर जाऊन राज्य मंडळाच्या mahresult.nic.in या निकालासाठीच्या अधिकृत साइटवर भेट द्यायची आहे. 

यानंतर मग त्या वेबसाईटच्या होमपेजवरील Maharashtra SSC and HSC Result या लिंकवर क्लिक करायचे आहे. ही लिंक जेव्हा दहावी आणि बारावीचा रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हाच जनरेट केली जाते. यामुळे जर तुम्ही आता वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला ही लिंक दिसणार नाही.

मात्र जेव्हा रिझल्ट जाहीर होईल तेव्हा तुम्हाला वेबसाईटवर ही लिंक दिसेल आणि तुम्हाला या लिंकवर क्लिक करून तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे लागणार आहे. 

यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमचा रिझल्ट दिसणार आहे. आता तुम्ही तुमच्या निकालाची PDF प्रिंटआऊट काढून घेऊ शकता.

Leave a Comment