महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी अन 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला लागणार बोर्डाचा निकाल, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board 10th And 12th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत. यंदा बारावी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत संपन्न झाल्या आहेत. तसेच यावर्षी दहावी बोर्ड परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. आम्ही आपणास सांगू इच्छितो की यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बोर्ड परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेच्या निकालाची खऱ्या अर्थाने आतुरता लागलेली आहे.

दरम्यान राज्य मंडळाने यंदा दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत नवीन अपडेट दिले आहे. यावर्षी या दोन्ही वर्गांचे निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर लागण्याची शक्यता मंडळाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

खरेतर सध्या या दोन्ही बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून उत्तरपत्रिकांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे आणि ताज्या वृत्तानुसार महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12वी चा निकाल हा मे महिन्यातच जाहीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यंदा केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल 20 मे नंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार असून दहावीचा निकाल हा या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची आतुरता होती तो निकाल या चालू महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. निकाल लागण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 जाहीर झाल्यानंतर, थेट निकालाची लिंक महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर सक्रिय केली जाणार आहे.

या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागल्यानंतर बोर्डाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि निकालाबाबत अधिकची माहिती दिली जाणार आहे.

Leave a Comment