Maharashtra Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील पहिला-वहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. यामुळे या प्रकल्पाबाबत जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठे उत्सुकता आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
प्रामुख्याने रेल्वे वाहतूक सुधारण्यावर सरकारचा मोठा भर राहिला आहे. याच अनुषंगाने देशात सध्या स्थितीला संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या हाय स्पीड नेटवर्कचे जाळे तयार केले जात आहे.
वंदे भारत एक्सप्रेस या देशातील पहिल्या हायस्पीड ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत अधिक जलद झाला आहे. सध्या ही ट्रेन देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.
विशेष बाब अशी की यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात. परंतु ही वंदे भारत एक्सप्रेस फक्त 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. आता मात्र 320 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी बुलेट ट्रेन देखील आपल्या देशात सुरू होणार आहे.
ही बुलेट ट्रेन पहिल्यांदा मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर सुरू होणार आहे. यामुळे, मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास गतिमान होईल अशी आशा आहे. दरम्यान याच बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मोठी अपडेट दिली आहे.
देशात प्रथमच मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनसाठी J-SLAB बॅलस्टलेस ट्रॅक सिस्टिमचा वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या बॅलेस्टलेस ट्रॅकवर ही ट्रेन ताशी 320 किलोमीटर वेगाने धावू शकणार असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
153 किमी वयाडक्ट आणि 295.5 किमी लांबीच्या या ट्रॅकच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष बाब अशी की नुकताच काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प 2026 पर्यंत रुळावर येणार असे म्हटले होते.
म्हणजे 2026 मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. अर्थातच नागरिकांना बुलेट ट्रेन ने 2026 पर्यंत प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
निश्चितच नियोजित वेळेत जर हा प्रकल्प सुरू झाला तर भविष्यात महाराष्ट्रातून गुजरात जाणे आणखी सोयीचे होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची राजधानी आणि गुजरातची राजधानी परस्परांना जोडली जाणार आहे.
https://x.com/AshwiniVaishnaw/status/1773256469653192843?s=20