राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यात मानधन वाढणार ! राज्य शासनाचे आश्वासन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Employee News : राज्य शासनाने नुकत्याच या चालू वर्षातील मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचे संबंध महाराष्ट्रभरातून स्वागत करण्यात आले.

अनेक राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी शासनाच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले. मात्र ही मानधन वाढ मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना मोठा लढा उभारावा लागला होता. या आपल्या मुख्य मागणीसाठी सेविकांनी मोठे आंदोलन केले होते.

तेव्हा कुठे राज्यातील या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य शासनाकडून दिलासा देण्याचे काम झाले आहे. अशातच आता राज्य शासनाकडून एक मोठे आश्वासन देण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात कार्यरत असलेल्या तीस हजाराहून अधिक प्रेरिका यांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील लाखो महिला बचत गटांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्याचे जबाबदारी प्रेरिका यांच्यावर आहे. या प्रेरिका म्हणजेच मार्गदर्शन करणाऱ्या महिलांना सध्या जेमतेम अडीच ते तीन हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. विशेष म्हणजे या अल्प मानधनात देखील काटछाट होत असते.

यामुळे हातात खूपच तोकडी रक्कम या कर्मचाऱ्यांना मिळते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र श्रमिक सभेच्या वतीने महाराष्ट्र प्रेरिका सभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील प्रेरिकांचे मानधन वाढवण्यासाठी निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखवली आहे. महाजन यांनी येत्या दोन महिन्यात राज्यातील प्रेरिकांना मानधन वाढ दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, या प्रेरिकांना 18000 रुपये मानधन देण्याची मागणी केली जात असून या कर्मचाऱ्यांना देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धरतीवर ग्रॅच्युटीचा लाभ मिळाला पाहिजे असे निवेदन देण्यात आले आहे. यामुळे आता राज्य शासन खरच यावर सकारात्मक निर्णय घेते का? याकडे विशेष लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment