Maharashtra Expressway News : देशात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पुर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे नजीकच्या काळात सुरू होणार आहे. असाच एक प्रकल्प आहे विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
खरंतर हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नुकतेच टेंडर पास करण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार या 126 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम एकूण 11 पॅकेज मध्ये केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटर लांबीचे काम केले जाणार असून हे काम एकूण 11 पॅकेज मध्ये होणार आहे. या अकरा पॅकेजसाठी 14 कंपन्यांनी 33 टेंडर दाखल केले होते. मात्र यातील सात कंपन्यांचे टेंडर पास झाले आहे.
चार कंपन्यांना प्रत्येकी दोन पॅकेजसाठी आणि तीन कंपन्यांना प्रत्येकी एक पॅकेजेसाठी निवडले गेले आहे. हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
तसेच दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 18431 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठी गंभीर बनली आहे.मात्र या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी दूर होणारा असा विश्वास व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला मुंबई अहमदाबाद महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, पनवेल जेएनपीटी आणि अटल सेतू हे प्रकल्प जोडले जाणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या विरार ते अलिबाग दरम्यान प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना चार ते पाच तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. परंतु जेव्हा हा महामार्ग रेडी होईल तेव्हा प्रवासाचा हा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे.
या महामार्गामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होईल असा दावा केला जात आहे. खरे तर आधी या प्रकल्पाचे काम एमएमआरडीए करणार होते. मात्र भूसंपादनाला उशीर झाल्याने हा प्रकल्प एमएसआरडीसी कडे वर्ग करण्यात आला आहे.
आता एम एस आर डी सी कडून या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात विरार ते अलिबाग हा प्रवास गतिमान होणार अशी आशा आहे.