Marriage Certificate कसं काढणार ? घरबसल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा ? पहा प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marriage Certificate Application : तुमचही नवीन लग्न झालाय का ? मग आजची ही बातमी तुमच्या खूपच उपयोगाची ठरणार आहे. खरंतर नवीन लग्न झाल्यानंतर सर्व्यात आधी नवविवाहित वधूचे कागदपत्रे बदलली जातात. जसे की आधार कार्ड वरील नाव अन पत्ता चेंज करणे, रेशन कार्ड मध्ये नाव जोडणे असे अनेक कामे केली जातात. यासाठी मात्र मॅरेज सर्टिफिकेट लागत असते.

मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी आधी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असत. आता मात्र मॅरेज सर्टिफिकेट काढण्याची प्रोसेस खूपच सोपी झाली आहे. मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आता ऑनलाईन माध्यम उपलब्ध झाले आहे.

मॅरेज सर्टिफिकेट साठी आता ऑनलाइन अर्ज करता येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत एप्लीकेशन वरून देखील अर्ज करता येतो. म्हणजे आता घरबसल्या मॅरेज सर्टिफिकेट साठी अर्ज करता येतो.

दरम्यान आज आपण घरबसल्या मॅरेज सर्टिफिकेट साठी अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे, कोणत्या एप्लीकेशनवरून यासाठी अर्ज करावा लागतो? याविषयी डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मॅरेज सर्टिफिकेटसाठी घरबसल्या अर्ज कसा करणार ?

मॅरेज सर्टिफिकेटसाठी अर्ज करणे हेतू mahaegram Citizen Connect या एप्लीकेशन वरून अर्ज करावा लागणार आहे. हे एप्लीकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum या लिंक वर जाऊन तुम्ही महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट साठी अर्ज सादर करता येणार आहे.

एप्लीकेशन मध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशनच्या होम डॅशबोर्ड वर विवाह नोंदणी अर्ज असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल तो अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. यात तुम्हाला साक्षीदारांची देखील माहिती भरावी लागणार आहे. तसेच अर्जात सांगितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत.

अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक भेटेल. हा अर्ज क्रमांक घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जायचे आहे. या ठिकाणी मग तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट दिले जाणार आहे.

Leave a Comment