Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था मोठी मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी कोकणातील प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कशेडी बोगदा आता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
आज एक मे अर्थातच महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा बोगदा कोकणवासीयांसाठी खुला करण्यात आला असल्याने कोकणातील नागरिकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
आता कशेडी बोगद्याचा वापर मुंबईकडे जाण्यासाठी देखील करता येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. आज महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने लहान वाहनांना बोगद्यातून प्रवेशाची परवानगी दिली आहे.
म्हणजे आता कशेडीतील एका बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई ते गोवा असा प्रवास करण्यासाठी या बोगद्यातून लहान वाहनांना प्रवेश दिला जात होता. मात्र गोव्याहून येणाऱ्या वाहनांना या बोगद्याने प्रवास करण्यास प्रतिबंध होता.
आता मात्र गोव्याहून येणाऱ्या हलक्या वाहनांना अर्थातच लहान वाहनांना देखील या बोगद्याने प्रवास करता येणार आहे. आज पासून गोव्याहून येणाऱ्या हलक्या वाहनांना या बोगद्यातून प्रवास करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खरे तर हा बोगदा दुहेरी वाहतुकीसाठी सुरू झाला पाहिजे अशी मागणी येथील प्रवाशांच्या माध्यमातून केली जात होती. याच मागणीची दखल घेत अखेर प्रशासनाने आता गोव्याहून मुंबईला येणाऱ्या हलक्या वाहनांना देखील या बोगद्याने प्रवास करण्यास परवानगी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
तथापि कशेडी घाटातील या बोगद्यातून जड वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. एसटी बस, मालवाहू ट्रक, टँकर, डंपर यासह अवजड वाहनांना कोणत्याही परिस्थितीत बोगद्याचा वापर करता येणार नसल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले आहे.
अवजड वाहने आधीप्रमाणेच कशेडी घाट मार्गाचा वापर करून मुंबई – गोवा व गोवा – मुंबई असा प्रवास करतील असे प्रशासनाने म्हटले आहे. खरे तर येत्या काही दिवसात अक्षयतृतीयाचा मोठा सण येत आहे आणि या सणापूर्वीचा हा बोगदा हलक्या वाहनांसाठी सुरू झाला असल्याने याचा कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईहून कोकणात आणि कोकणहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना या बोगद्यामुळे जलद गतीने प्रवास करता येणार असून यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाचे कोकणातील प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.