महिलांसाठी सरकारची खास बचत योजना ! मिळणार 32 हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक फायदा, किती गुंतवणूक करावी लागणार ? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Samman Savings Certificate Scheme : पूर्वी महिला बचतीचे पैसे सोन्यात गुंतवत असत. आता मात्र महिलांचा माईंड सेट बदलला आहे. महिला सोन्यात तर गुंतवणूक करतच आहेत शिवाय इतर बचत योजनांमध्ये देखील महिलांची गुंतवणूक वाढू लागली आहे. महिला एफडी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत.

दरम्यान, आज आपण महिलांसाठी अशाच एका बचत योजनेची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण ज्या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ती एक सरकारी बचत योजना असून यामध्ये गुंतवणूक केलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो. विशेष म्हणजे या योजनेतील गुंतवणुकीवर चांगले व्याज देखील दिले जात आहे.

या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. यामध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना 32 हजार रुपयांपर्यंतचे व्याज मिळते. दरम्यान, आता आपण या योजनेचे स्वरूप अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे ही बचत योजना ?

ही योजना भारत सरकार द्वारे चालवली जात आहे. ही एक स्मॉल सेविंग स्कीम असून यामध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. ही योजना दोन वर्षात परिपक्व होत असते. या योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशांवर 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जाते.

या योजनेत किमान एक हजार रुपये आणि कमाल दोन लाख रुपये पर्यंतची रक्कम गुंतवता येते. दोन लाख रुपयांच्या अधिकची रक्कम या योजनेत गुंतवता येत नाही.

2 लाख रुपये गुंतवले तर किती व्याज मिळणार

या योजनेत जर तुम्ही 50 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला आठ हजार अकरा रुपये एवढे व्याज मिळणार आहे. म्हणजे योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अर्थातच दोन वर्षांनी 58 हजार अकरा रुपये मिळणार आहेत.

एखाद्या महिलेने या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटी वर एक लाख 16 हजार 22 रुपये मिळणार आहेत. जर एखाद्या महिलेने यामध्ये दीड लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर एक लाख 74 हजार 33 रुपये मिळणार आहे. दोन लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी वर दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळणार आहेत.

मुदतीपूर्वी पैसे काढता येतात

तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेत जाऊन या योजनेत खाते ओपन करू शकता. यामध्ये अल्पवयीन मुलींना देखील गुंतवणूक करता येते मात्र यासाठी सदर मुलीच्या नावे पालकांना खाते ओपन करावे लागते.

ही योजना दोन वर्षांची आहे मात्र एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून 40 टक्के रक्कम काढता येऊ शकते. म्हणजेच जर या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही चाळीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता.

Leave a Comment