Maharashtra Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने सामूहिक प्रयत्नातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत.
पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्यात विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा महामार्ग खूपच जलद गतीने पूर्ण केला जात आहे. आत्तापर्यंत समृद्धी महामार्गाचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
खरंतर समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते भरवीर हे 600 किमीचे अंतर पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील जलद गतीने पूर्ण करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा संपूर्ण महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण केले जात आहे तर दुसरीकडे गेल्या 14 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही. यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हा महामार्ग अखेर केव्हा पूर्ण होईल आणि यावर केव्हा वाहने सुसाट धावतील हा कोकणातील प्रवाशांचा प्रश्न गेल्या 14 वर्षांपासून कायम आहे. खरंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2011 मध्ये सुरू करण्यात आले होते. पण या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता 2023 संपत चालला आहे तरी देखील पूर्ण झालेले नाही.
यामुळे या मार्गाबाबत आता प्रवाशांमध्ये अनास्था पाहायला मिळत आहे. हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार ? हे काही सांगता येत नाहीये. दरम्यान या महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी माहिती दिली आहे. खरंतर, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी 471 किलोमीटर एवढी आहे.
याचे काम गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे. अजून हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. यामुळे रोडकरी नावाने प्रसिद्ध असलेल्या गडकरींना याबाबत एका मुलाखतीत प्रश्न विचारला असता त्यांनी एक महत्त्वाचे विधान दिले आहे. गडकरी म्हटले की, या महामार्गाच्या रखडपट्टीला सर्वस्वी मीच जबाबदार आहे.
सकाळ वृत्त समूहाने गडकरी यांची नुकतीच एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत गडकरी यांनी या महामार्गाच्या कामास सर्वस्वी आपणच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 2014 ते 2023 हा नऊ वर्षाचा कार्यकाळ उलटूनही या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसल्याने याची सर्वस्वी जबाबदारी माझीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवाय त्यांनी या महामार्गासाठी आपण आत्तापर्यंत सर्वात जास्त बैठकी घेतल्या असल्याचे देखील सांगितले आहे. या महामार्गासाठी आत्तापर्यंत 75 ते 80 बैठका झाल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले असून हा महामार्ग आता लवकरच बांधून पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. गडकरी यांनी हा महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे तयार होईल आणि यानंतर हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी पूर्णता सुरू होईल असा दावा यावेळी केला आहे.
त्यामुळे आता हा महामार्ग गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होतो का याकडे संपूर्ण कोकणातील नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान, हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा हा प्रवास आणखी जलद आणि सुरक्षित होईल. यामुळे प्रवाशांच्या वेळेत आणि खर्चात बचत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.