पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ मार्गावर सुरू होणार लोकल सेवा, किमान तिकीट दर असेल फक्त 5 रुपये, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. 15 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव 24 ऑक्टोबर पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानंतर पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे.

अशा या सणासुदीच्या काळातच पुणेकरांसाठी एक गुड न्युज समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातील एका महत्त्वाच्या मार्गावर लोकल सेवा सुरू होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी जलद होईल आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

खरंतर सध्या स्थितीला पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरू आहे. यामुळे पुणे ते लोणावळा हा प्रवास खूपच जलद आणि खिशाला परवडणारा असा झाला आहे. अशातच आता पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे पुणे ते दौंड हा प्रवास देखील पुणे-लोणावळा प्रवासाप्रमाणेच सुरक्षित, जलद आणि खिशाला परवडणारा होईल असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते दौंड रेल्वे सेवा उपनगरीय करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे.

दरम्यान रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला जर मान्यता दिली तर या मार्गावर डिझेल मल्टिपल युनिट म्हणजेच डेमो ट्रेन ऐवजी इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट म्हणजे एमू ट्रेन धावणार आहेत. विशेष म्हणजे या इलेक्ट्रिकल गाड्यांचे तिकीट दरही कमी राहणार आहेत.

वास्तविक, पुणे ते दौंड दरम्यानची रेल्वे सेवा लोकल म्हणजेच उपनगरी करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून या भागातील प्रवाशांच्या माध्यमातून केली जात आहे. यासाठी रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा देखील सुरू आहे.

याच पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे विभागाने याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. सध्या रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावावर विचार केला जात आहे. आता रेल्वे बोर्डाने जर या प्रस्तावाला मान्यता दिली तर या मार्गावर लोकल सेवा सुरू होणार आहे. डेमू ट्रेन ही 10 डब्यांची असते मात्र एमू ट्रेन ही बारा डब्यांची राहणार आहे.

लोकलचे तिकीट किती राहील 

सध्या पुणे ते दौंड दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या एक्सप्रेस किंवा पॅसेंजर म्हणून धावत आहेत. या गाडीमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किमान 30 रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे.

परंतु ज्यावेळी या मार्गावर लोकल सेवा सुरू होईल तेव्हा तिकीट दर हे किमान पाच रुपयांचे होईल अशी माहिती समोर येत आहे. साहजिकच यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भार बऱ्यापैकी कमी होणार आहे.

Leave a Comment