महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते वाहतूक ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. राज्यात अनेक नवीन महामार्ग तयार झाले आहेत. तसेच काही मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून त्यांचे नव्याने काम सुरू करण्यात आहे.

कोकणातील रायगड जिल्ह्याच्या म्हाप्रळ भोर मार्गे पुणे येथे जाणार्‍या मार्गाला सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय झाला असून सध्या या मार्गावरील काही भागाचे काम केले जात आहे. या मार्गाचे राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दी पर्यतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम केले जात आहे.

सध्या स्थितीला हे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र असे असले तरी या मार्गावरील वरंधा घाटाच्या रुंदीकरणाचे काम आणि संरक्षक भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

तसेच या घाटातील काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद करावी लागणार आहे तेव्हाच या घाटातील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल अशी आशा आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा घाट मार्ग आता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

1 एप्रिल 2024 पासून हा घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हा घाट मार्ग जवळपास दोन महिने कालावधीसाठी म्हणजेच 31 मे पर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

यानुसार वरंध गाव ते रायगड जिल्हाहद्दीपर्यंतचा हा घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. जवळपास दोन महिने हा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

यामुळे कोकणातून पुण्याला जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाचे काम सुरू असून पावसाळ्यात हा घाट मार्ग बंद केला जातो.

आता मात्र पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर हा घाट मार्ग पुढील दोन महिन्यांसाठी संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिणामी आता पुढील दोन महिने कोकणातील नागरिकांना जर पुण्याला जायचे असेल तर ताम्हणे मार्गे अथवा महाबळेश्वर मार्गे प्रवास करावा लागणार आहे. यामुळे साहजिकच नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाया जाणार आहे.

मात्र या कालावधीत जर घाट मार्गाचे काम पूर्ण झाले तर पावसाळ्यात या मार्गाने विनाअडथळा प्रवास करता येईल आणि प्रवाशांची कटकट कायमची दूर होणार आहे.

Leave a Comment