Maharashtra Government Employee DA Hike : सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा आनंददायी पर्व साजरा केला जात आहे. नवरात्र उत्सवामुळे संपूर्ण देशात मोठे प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण आहे. या प्रसन्न वातावरणात केंद्रातील मोदी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा 4% वाढवला आहे.
जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र आता केंद्र शासनाने जुलै महिन्यापासून यामध्ये आणखी चार टक्के वाढ करण्याचे जाहीर केले आहे. यानुसार संबंधितांचा महागाई भत्ता आता 46% एवढा बनला आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली असून संबंधित केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून यावेळी वर्ग केली जाणार आहे.
दरम्यान, केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील कार्यरत 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा केव्हा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यात दिवाळीचा सण सेलिब्रेट केला जाणार असल्याने राज्यातील शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्र शासनाच्या धर्तीवर ताबडतोब वाढवला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
अशातच राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएबाबत एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागु केलेली डी.ए वाढ बाबतची कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही नुकतीच महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाकडे आली आहे.
याचा अर्थ आता लवकरच राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता लवकरच वाढवला जाणार आहे. अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चार टक्के एवढा वाढवला जाणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाढेल
अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की लगेचच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे याबाबतचा निर्णय हा लवकरच होणार आहे. सध्या स्थितीला याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रस्ताव तयार झाला की लगेचच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता दिली जाईल. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच म्हणजे च्या चालू आठवड्यातच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निश्चितच शिंदे सरकारने हा निर्णय घेतला तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. परिणामी संबंधितांचा सण गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.