Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या काळात आनंदाची बातमी समोर येत आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की दिवाळीचा सण मात्र तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 9 नोव्हेंबर रोजी अर्थातच गोवत्स द्वादशी, वसुबारस पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. दिवाळी 15 नोव्हेंबर पर्यंत साजरी केली जाणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या काळात राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच सेवानिवृत्त, पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशाने नवरात्र उत्सवाचा पावन पर्व मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे.
याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत होता. परंतु यामध्ये केंद्र शासनाने चार टक्के एवढी वाढ केली आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली असून याचा रोखीने लाभ या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत संबंधितांना दिला जाणार आहे.
याचाच अर्थ जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार असे वृत्त समोर आले आहे.
विशेष बाब अशी की याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून तयार झाला असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. तसेच हा प्रस्ताव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
या प्रस्तावाला एकदा की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली की राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल असे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के वाढवला जाणार आहे.
सध्या या संबंधितांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. पण आता यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता 46% एवढा होईल आणि ही DA वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाईल.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे. या चालू महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून वर्तमान शिंदे सरकार याबाबतचा निर्णय केव्हा घेते, हा निर्णय दिवाळीपूर्वी होणार का ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.