ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ 10 जिल्ह्यात 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहणार, पाऊसही बरसणार, हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : दिवाळीचा सण मात्र तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पावसाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

ती म्हणजे यंदा दिवाळीच्या काळात राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. वरूणराजा देखील यंदा दिवाळी साजरा करण्यासाठी आपली हजेरी लावणार आहे.

खरंतर यावर्षी मानसून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामातील पिकांच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी अवकाळी पावसाची गरज भासणार आहे. अवकाळी पाऊस हा नेहमीच शेती पिकांसाठी घातक ठरतो मात्र यंदा परिस्थिती खूपच बिकट असल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात चांगला समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे खरीप हंगाम तर हातचा गेला आहे आता रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पन्न मिळावे असे शेतकऱ्यांची इच्छा आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाची आतुरता लागून आहे. जर येत्या काही दिवसांत मोठा अवकाळी पाऊस बरसला तर याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होऊ शकतो सोबतच यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

पण जर अवकाळी पाऊस बरसला नाही तर राज्यातील बहुतांशी भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काही ठिकाणी तर हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होतील असे भीषण चित्र तयार होण्याची भीती आहे.

यामुळे सध्या अवकाळी पावसासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडून देव नवसला जात आहे. अशातच आता राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी राज्यातील काही जिल्ह्यात आगामी चार दिवस ढगाळ हवामान राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

तसेच त्यांनी तुरळक ठिकाणी पावसाची देखील शक्यता वर्तवली आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात सहा नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस म्हणजे गुरुवारी 9 तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असल्याचे सांगितले आहे.

सोबतच या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय खुळे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचा गारवा कमी होईल सोबतच दुपारचे कमाल तापमान देखील काहीसे अधिक राहील असे आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.

शिवाय या संबंधित भागात पावसाची शक्यता नसल्याची माहिती देखील माणिकराव खुळे यांनी यावेळी दिली आहे. यामुळे आता खुळे यांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण राज्याचे बारीक लक्ष राहणार आहे.

Leave a Comment