‘हा’ व्यवसाय बनवणार श्रीमंत ! एकदा गुंतवणूक करा आणि लाईफटाईम मिळवा उत्पन्न, महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : भारतीय अर्थव्यवस्था ही तेजीने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे. सध्या स्थितीला भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. आगामी काही वर्षात हा ग्राफ आणखी सुधारणार आहे. अर्थतज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित होणार असा आशावाद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे जगातील अनेक नामांकित संस्थां भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात ताकतवान अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहेत.

दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देशातील छोटे-मोठे स्टार्टअप देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. छोटे मोठे उद्योग देखील भारतीय अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आपले योगदान देऊ लागले आहेत. अलीकडे तर आपल्या देशात लाखोंच्या संख्येने स्टार्टअप ओपन झाले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमचा छोटासा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की आज आपण एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत चर्चा करणार आहोत. आज आपण अशा एका व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत ज्या व्यवसायात एकदा गुंतवणूक केली की पुन्हा गुंतवणूक करण्याची गरजच भासत नाही. विशेष म्हणजे या व्यवसायात कधीच मंदी येऊ शकत नाही. जसं की आपणास ठाऊकच आहे की देशात गेल्या काही दशकांमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने दिन दोगुनी और रात चौगुनी अशी प्रगती केली आहे.

आता आपल्या देशात प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन आहे. टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलर, मालवाहतूक गाड्याची संख्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा उचलू शकता. तुम्ही कार वॉशिंग बिझनेस सुरु करून चांगली कमाई करू शकणार आहात. आता आपण कार वॉशिंग बिझनेस बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कार वॉशिंग बिझनेस

भारतात वाहनांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे ही संख्या दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. यामुळे कार वॉशिंग बिझनेस देखील मोठ्या डिमांड मध्ये आला आहे. आता लोकांकडे स्वतःचे वाहन धुण्यासाठी वेळ नाही. यामुळे आता बहुतांशी लोक कार वॉशिंग सेंटरवर जाऊन आपली वाहने वॉश करतात. यामुळे तुम्ही या संधीचा फायदा उचलू शकता आणि हा बिजनेस सुरु करून चांगले उत्पन्न कमवू शकणार आहात. या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला सहा लाखांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. परंतु एकदा गुंतवणूक केली की तुम्हाला या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत राहणार आहे.

बिझनेस सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील 

कार वॉशिंग बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला जागेची गरज भासणार आहे. हा बिजनेस अशा ठिकाणी सुरू केला पाहिजे ज्या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. तुम्ही महामार्गालगत हा व्यवसाय सुरू करू शकता. शहराबाहेर असणाऱ्या महामार्गालगत जर हा व्यवसाय सुरू केला तर यातून चांगली कमाई होण्याचीशक्यता तयार होते. कार वॉशिंग बिजनेस सुरू करण्यासाठी, तुम्हाला किमान 1500 चौरस फूट जागा लागणार आहे.

जर तुमची स्वतःची जागा असेल तर अतिउत्तम पण जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही भाड्याने जागा घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला किमान दोन ट्रेन वर्कर, पाणी आणि वीज जोडणी लागणार आहे. तसेच काही मशिन्स देखील खरेदी करावी लागणार आहेत. तुम्हाला कार वॉशिंग स्टँड बनवण्यासाठी, कार पार्क करण्यासाठी आणि येणाऱ्या ग्राहकांना बसण्यासाठी आणि पाण्याचे पंप बसवण्यासाठीही जागा लागणार आहे.

किती गुंतवणूक करावी लागेल

या व्यवसायासाठी सहा लाखांपर्यंतची गुंतवणूक लागते. जागा जर भाड्याने घेत असाल तर तुम्हाला थोडी अधिक गुंतवणूक करावी लागू शकते. या व्यवसायासाठी तुम्हाला काही मशीन्स लागतील. एअर कॉम्प्रेसर, फोम जेट सिलेंडर, उच्च दाब पाण्याचा पंप आणि व्हॅक्यूम क्लिनर या मशीन्स तुम्हाला लागणार आहेत. या सर्व मशिनी तुम्हाला दोन लाख रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय तुम्हाला कार वॉशिंग सेंटरमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी दोन रूम तयार करावे लागतील. रूम तयार करण्यासाठी आणि इतर सिव्हिल वर्क करण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

कार वॉशिंगसाठी स्टॅन्ड देखील तयार करावा लागणार आहे. जर विटा आणि सिमेंटचा वापर करून हा स्टॅन्ड तयार केला तर तुम्हाला 50000 पर्यंतचा खर्च येईल. जर तुम्ही लोखंडी स्टॅन्ड बनवण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला 70000 पर्यंतचा खर्च येऊ शकतो. अशा तऱ्हेने जर तुमच्याकडे स्वतःची जागा असेल तर तुम्ही हा व्यवसाय सहा लाख रुपये गुंतवणूक करून सुरू करू शकता. जागा मात्र तुम्ही दुसऱ्याकडून भाड्याने घेत असाल तर तुम्हाला यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे.

किती कमाई होणार

जर तुमचा व्यवसाय चांगला चालला आणि तुम्ही दिवसाला जवळपास 20 वाहने जर वॉश करत असाल तर तुम्हाला यातून तीन हजारापर्यंतची कमाई होणार आहे. यातून वर्करची सॅलरी आणि इतर खर्च वजा करता तुम्हाला 70 टक्के कमाई होणार आहे. म्हणजेच दिवसाला जवळपास दोन हजार रुपयांपर्यंतची कमाई तुम्हाला यातुन होऊ शकते. अर्थातच महिन्याकाठी 60 हजार रुपये आणि वार्षिक आधारावर तुम्हाला सात लाख रुपयांपर्यंतची कमाई या व्यवसायातून होऊ शकणार आहे. मात्र हे सर्वस्वी तुमचा व्यवसाय कसा चालतो यावर अवलंबून राहणार आहे. जर धंदा चांगला चालला तर तुम्हाला निश्चितच यातून चांगली कमाई होणार आहे.

Leave a Comment