Maharashtra Government Scheme : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपला देश संविधानात नमूद केलेल्या आदर्श तत्त्वांचा वापर करत विकासाला गवसणी घालत आहे. केंद्राच्या माध्यमातून तसेच देशातील विविध घटक राज्यांच्या माध्यमातून संविधानात नमूद करण्यात आलेल्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेसाठी आप-आपल्या पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत.
हेच कारण आहे की आज आपला भारत देश जलद गतीने विकसनशील देशाच्या यादीतून उठून विकसित होण्याच्या मार्गावर आला आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पण लवकरच हे चित्र बदलेल अन आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे.
मात्र असे असले तरी भारताची पुरुष प्रधान संस्कृती अजूनही पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. त्यामुळे देशाचा एकात्मिक विकास व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्यातील विधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला आणि निराधार महिलांसाठी अशीच एक कौतुकास्पद योजना राबवली जात आहे. याला संजय गांधी निराधार योजना असे नाव देण्यात आले आहे.
या अंतर्गत या निराधार महिलांना वार्षिक 18 हजार रुपयाचा अर्थातच दर महिना 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेसाठी आवश्यक असलेली पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला मिळणार लाभ?
राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ राज्यातील विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, इत्यादी दुर्बल महिलांना दिला जात आहे.
कोण-कोणती कागदपत्रे लागणार
- विहीत नमुन्यातील अर्ज
- वयाचा दाखला
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यू दाखला.
- दिव्यांग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक
- अनाथ असल्यास त्याबाबतचा सक्षम प्राधिकरणाचा दाखला
- दुर्धर आजार असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- रेशनकार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- अर्जदाराचा फोटो
अर्ज कुठे करायचा बरं
यासाठी पात्र लाभार्थ्याला जवळील तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करता येणार आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अर्जाची सविस्तर प्रोसेस समजणार आहे. अर्ज सादर करताना सांगितलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला मात्र जोडावी लागणार आहेत.
दुसरीकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Errors/Error?aspxerrorpath=/en/Login/Certificate या वेबसाईटवर जाऊन इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.