फक्त तोटेच नाही तर पर्सनल लोनचे ‘हे’ फायदे देखील आहेत ! वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Loan Benefits : बँका ग्राहकांना वेगवेगळे कर्ज पुरवतात. होम लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, गोल्ड लोन असे अनेक प्रकारचे कर्ज ग्राहकांकडून घेतले जात असते. याशिवाय बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन देखील दिले जाते.

मात्र असे प्रकारचे कर्ज खूपच इमर्जन्सी असेल तेव्हाच घेतले गेले पाहिजे असा सल्ला तज्ञांनी दिलेला आहे. त्याचे कारण म्हणजे पर्सनल लोनवर बँकांच्या माध्यमातून खूप अधिक व्याजदर आकारले जाते.

परंतु हे वास्तव असले तरी देखील वैयक्तिक कर्ज अर्थातच पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा बँकेचे पर्सनल लोन कामी येते यात शंकाच नाही.

पण यावर आकारले जाणारे व्याजदर हे ग्राहकांसाठी खूपच मारक ठरते. पण पर्सनल लोनचे काही फायदे देखील आहेत. दरम्यान आज आपण पर्सनल लोनचे असेच काही फायदे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वैयक्तिक कर्जाचे फायदे नेमके काय

कॉलॅटरल फ्री कर्ज : अचानक पैशांची गरज भासली तर पर्सनल लोन अगदी सहजतेने प्राप्त करता येते. यामुळे याला आपत्कालीन कर्ज असेही संबोधले जाते.

दरम्यान पर्सनल लोन मंजूर करताना बँकेच्या माध्यमातून कोणतीच मालमत्ता तारण म्हणून मागितली जात नाही. म्हणजे हे एक कॉलॅटरल फ्री लोन आहे.

कर्च लवकर मिळतं : या कर्जासाठी कधीही आणि कोठूनही अर्ज केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे बँका देखील अशा प्रकारचे कर्ज ताबडतोब मंजूर करून देतात. अशा परिस्थितीत या कर्जाला ग्राहकांकडून पसंती दाखवली जात आहे.

कर्जाचे पैसे कुठेही वापरता येऊ शकतात : आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गृहकर्ज, कार लोन, दुचाकी कर्ज इत्यादी बँकांनी दिलेल्या बहुतांश कर्जांमध्ये कर्जाच्या वापरावर बंधने आहेत, परंतु वैयक्तिक कर्जाबाबत असे कोणतेही बंधन नाही.

तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार तुम्ही ते कुठेही वापरू शकतात. हीच या कर्जाची सर्वात मोठी विशेषता आहे. यामुळेच याला वैयक्तिक कर्ज म्हणतात.

कर्ज परतफेडीसाठी मिळतो पुरेसा कालावधी : या कर्जाच सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला चांगला वेळ दिला जातो. या कर्जासाठी एक लवचिक परतफेड कालावधी आहे जो सामान्यतः 12 महिने ते 60 महिन्यांदरम्यान असतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सोयीनुसार अशा प्रकारचे कर्ज फेडू शकता.

Leave a Comment